भाजप पदाधिकाऱ्याची अशीही तऱ्हा, तलवारीने पन्नास केक कापत वाढदिवस साजरा
Bjp Office Bearer CelebrationSarkarnama

भाजप पदाधिकाऱ्याची अशीही तऱ्हा, तलवारीने पन्नास केक कापत वाढदिवस साजरा

(Recognition of Pankaja Munde as a trusted office bearer)बाबरी मुंडे हे वडवणी तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कलचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य देखील आहेत.

बीड ः अतिवृष्टी आणि ढगफुटीचा सर्वाधिक फटका बसलेल्या बीड जिल्ह्यात राजकीय नेत्यांच्या वाढदिवस आणि सार्वजनिक कार्यक्रमांमधील नाचगाणे, हार-तुरे यावरून चांगलेच राजकारण तापले होते. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे मेळावे, त्यात झालेले सत्कार यावरून पालकमत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला होता.

एवढा कशाचा आनंद झाला होता, अशा शब्दात त्यांनी राष्ट्रवादीला खडे बोल सुनावले होते. पण आता त्यांच्याच एका जवळच्या युवा पदाधिकाऱ्याने आपल्या वाढदिवसानिमित्त चक्क पन्नास केक तलवारीने कापत जल्लोष केला. एवढेच नाही तर डीजे लावून त्यावर ठेकाही धरला. त्यामुळे आता भाजपवर टीका सुरू झाली आहे.

काही महिन्यांपुर्वी जिल्ह्यात अतिवृष्टी आणि ढगफुटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. या ढगफुटीचा सर्वाधिक फटका हा वडवणी भागाला बसला होता. शेतकऱ्यांना अजूनही मदतीची प्रतिक्षा आहे. अशावेळी राजकीय पक्षांनी गांभीर्याने वागण्याची अपेक्षा असते, परंतु सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकाच माळेचे मणी आहेत की काय? असा प्रश्न या प्रकारामुळे सामान्यांना पडला आहे.

पंकजा मुंडे यांचा विश्वासू पदाधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजप युवा नेत्याने आपला वाढदिवस साजरा करतांना शेतकऱ्यांच्या भावना अक्षरशा पायदळी तुडवल्या. बाबरी मुंडे या पदाधिकाऱ्याने आपल्या वाढदिवशी तब्बल ५० केक, तेही तलवारीने कापल्याचा प्रकार समोर आला आहे. एवढ्यावरच न थांबता हा पदाधिकारी आणि त्याचे समर्थक बेभान होऊन डीजेच्या तालावरही नाचले.

Bjp Office Bearer Celebration
चाळीस वर्षापासून पवार साहेबांसोबत ; आताही कार्यकर्ता म्हणून काम करणार

बाबरी मुंडे हे वडवणी तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कलचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य देखील आहेत. आता राष्ट्रवादीला खडे बोल सुनावणाऱ्या भाजपच्या नेत्या आपल्या या समर्थकावर काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.