रावसाहेब दानवेंनी एक फोन फिरवला आणि रद्द झालेली एक्स्प्रेस धावली....

संतोष महाराज आढावणे पाटील यांनी थेट रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना फोन करून अडचण सांगितली. दानवेंनी क्षणाचाही विलंब न लावता संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना फोन लावला. (Jalna District)
रावसाहेब दानवेंनी एक फोन फिरवला आणि रद्द झालेली एक्स्प्रेस धावली....
Raosaheb DanveSarkarnama

भोकरदन : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) दिल्लीत जरी असले तरी आपल्या मतदार संघातील प्रत्येकाची काळजी ते घेत असतात. सध्या अधिवेशन सुरू असल्याने ते दिल्लीतच आहेत. मतदारसंघातील अडीचशेवर ज्येष्ठ नागरिक द्वारका येथे भागवत कथा ऐकण्यासाठी आलेले होते. पण परततांना रेल्वेचे आरक्षण असूनही गाडीच रद्द झाल्याने ते अडचणीत सापडले.

तेव्हा भागवत कथेचे आयोजक ह.भ.प. संतोष महाराज आढावणे पाटील यांनी थेट रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनाच फोन करून अडचण सांगितली. मग काय रावसाहेब दानवेंनी क्षणाचाही विलंब न लावता संबंधित रेल्वे व्यवस्थापकांना फोन लावला आणि रद्द झालेली ओखा-पुरी रेल्वे नियमित वेळवर भुसावळपर्यंत धावली.

गावापासून हजारो किलोमीटर दूर असूनही तात्काळ मदत मिळाल्यामुळे भाविकांनी व महाराजांनी रावसाहेब दानवे यांचे आभार मानले. तालुक्यातील कुंभारी येथील युवा कीर्तनकार तथा वारकरी संघाचे प्रदेश प्रवक्ते ह.भ.प. संतोष महाराज आढावणे पाटील यांनी द्वारका दर्शन व भागवत कथा अशी भक्तिमय यात्रा ज्येष्ठ नागरिकासाठी आयोजित केली होती. १ ते सात डिसेंबर दरम्यान या यात्रेत अडीचशे भाविक सहभागी झाले होते.

द्वारका येथे भागवत कथेचा समारोप झाल्यानंतर आज सायंकाळी सर्व भाविक परतीच्या प्रवासाला निघणार होते. मात्र काही कारणामुळे ओखा एक्सप्रेस रद्द झाल्याचे त्यांना समजले. महाराजांपुढे मोठा प्रश्न पडला, २४० प्रवासी यातील बहुतांश हे वयोवृद्ध,महिला. मग ऐनवेळी ट्रॅव्हल्सची व्यवस्था करणे देखील अशक्य होते.

Raosaheb Danve
`आमदार सुरेश धस यांचा एक हजार कोटींचा जमीन घोटाळा`

अशावेळी महाराजांनी थेट केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना फोन लावला व अडचण सांगितली. दानवे यांनी क्षणाचाही विलंब न लावता लगेच रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या, त्यांनी माहिती घेऊन लगेच संबंधित विभागाला रेल्वे नियोजीत वेळेत भुसावळपर्यंत रवाना करण्यास सांगितले.

त्यानंतर दानवे यांनी रद्द झालेली रेल्वे त्याच आरक्षित आसनावर संबंधितांची व्यवस्था करत भुसावळपर्यंत उपलब्ध करून दिली. दानवे यांनी स्वतः फोन करून संतोष महाराज आढावणे यांना कळवले. `तुमची रेल्वे देखील तीच असणार व तुमचे आरक्षित सीट देखील तेच असणार`, त्यानंतर मग भाविकांनी सुटकेचा निश्वास टाकला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.