Marathwada Teacher Constituency : प्रचार थांबला, सोमवारी मतदान ; काळे-पाटील यांच्यात थेट लढत..

Maharashtra : निवडणुकीत शाळा अनुदान, जुनी पेन्शन योजना हे विषय प्रामुख्याने दोन्ही पक्षांकडून मांडले गेले.
Marathwada Teachers Constituency News, Aurangabad
Marathwada Teachers Constituency News, AurangabadSarkarnama

Aurangabad : मराठवाड शिक्षक मतदारसंघासाठीचा प्रचार आज सायंकाळी थांबला, आता सोमवारी (ता.३०) प्रत्यक्ष मतदान होणार आहे. महाविकास आघाडीचे विक्रम काळे (Vikram Kale) विरुद्ध भाजपचे किरण पाटील यांच्यात थेट लढत होणार आहे. भाजपचे नवखे उमेदवार किरण पाटील तीन टर्म आमदार राहिलेल्या विक्रम काळेंना धक्का देतात? की मग काळेच बाजी मारतात हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

Marathwada Teachers Constituency News, Aurangabad
Ashok Chavan News : काॅंग्रेसशासित तीन्ही राज्यात जुनी पेन्शन योजना ; आम्ही जे सांगतो ते करतोच..

या निवडणुकीत शाळा अनुदान, जुनी पेन्शन योजना हे विषय प्रामुख्याने दोन्ही पक्षांकडून मांडले गेले. (Bjp) भाजपने जुनी पेन्शन योजना, अनुदानाच्या विषयासाठी महाविकास आघाडीला जबाबदार ठरवले, तर महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) भाजपवर आरोप करत त्यांच्याच काळात हे प्रश्न निर्माण झाल्याचे सांगितले. आता या आरोप-प्रत्यारोपाचा शिक्षक मतदारांवर किती परिणाम झाला, ते कोणाव विश्वास ठेवतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. प्रचारात या दोन्ही पक्षांनी आघाडी घेतल होती, काळेंसाठी आघाडीच्या नेत्यांनी अख्खा मराठवाडा पिंजून काढला.

अशोक चव्हाण, अजित पवार, शिवसेनेचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे यांनी महाविकास आघाडीच्या काळेंची बाजू लावून धरली. तर किरण पाटील यांच्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, देवेंद्र फडणवीस यांनी मेळावे घेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. जुनी पेन्शन योजना, अनुदानाच्या मुद्यावर बॅकफुटवर असलेल्या भाजपची कोंडी प्रचाराच्या शेवटच्या टप्यात उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दूर केली. जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात आपले सरकार सकारात्मक आहे, हे पटवून देण्यात फडणवीस यशस्वी ठरले.

जुनी पेन्शन योजना आणण्याची धमक आमच्यातच आहे, असे छातीठोकपणे सांगत फडणवीसांनी प्रचारात रंगत आणली होती. शिवाय हे प्रश्न राष्ट्रवादी-काॅंग्रेसच्याच काळातले आहेत, त्यांचे पाप, आम्ही निस्तारत आहोत, असेही फडणवीसांनी औरंगाबादच्या मेळाव्यात सांगत प्रचाराची रंगत वाढवली होती. शिक्षक मतदारसंघात नोंदणी महत्वाची मानली जाते. प्रचार यंत्रणा प्रभावीपणे राबवत मतदान करून घेणारा उमेदवार या निवडणुकीत बाजी मारतो हा आजपर्यंतचा अनुभव राहिला आहे.

भाजपचे किरण पाटील हे नवखे असले तरी त्यांच्याकडेही संस्था चालवण्याचा अनुभव आहे. शिवाय भाजपची मोठी ताकद त्यांच्या पाठीशी आहे. दुसरीकडे विक्रम काळे यांना तीन टर्मचा प्रदीर्घ अनुभव, प्रचार यंत्रणा राबवण्याचे कसब असल्याने या दोन उमेदवारांमध्ये चांगली लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना बंडखोरीचे ग्रहण लागले आहे.

Marathwada Teachers Constituency News, Aurangabad
Mla Santosh Bangar News : माझ्यावरचा गुन्हा खोटा, महिलांवर अत्याचार करणाऱ्याला पायाखाली तुडवू..

बंडखोर प्रचारात थंड..

प्रदीप सोळुंके यांनी महाविकास आघाडीकडून तर नितीन कुलकर्णी यांनी भाजपकडून बंडखोरी केली आहे. प्रचारात हे दोन्ही उमेदवार फारसे दिसले नाही, त्यामुळे त्यांचा किती उपद्रव या दोन्ही उमेदवारांना होतो, हे देखील लवकरच स्पष्ट होणार आहे. वंचितचा उमेदवार रिंगणात असला तरी तो प्रचारात कुठे दिसला नाही, त्यामुळे सुरुवातीला तिरंगी वाटणारी ही लढत आता थेट होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com