Marathwada : प्रचार संपला, आता मतदान ; मराठवाड्यात आघाडी ? की शिंदे-फडणवीसांची जादू..

Grampanchayt Election : सासू-सुन, दीर-भावजय, जावा-जावा, भाऊ-बहिण हे अनेक ठिकाणी ऐकमेकांविरुद्ध लढत आहेत.
Marathwada Grampanchayat Election News, Aurangabad
Marathwada Grampanchayat Election News, AurangabadSarkarnama

Aurangabad : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून ज्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकडे पाहिले जाते, त्या राज्यातील साडेसात हजार आणि मराठवाड्यातील २१५९ ग्रामपंचायतीसाठी उद्या (ता.१८) रोजी मतदान होत आहे. Grampanchayt Election गेल्या पंधरा दिवसांपासून मतदानासाठीची प्रक्रिया, माघार, बिनविरोध, प्रचार अशा घडामोडींना वेग आला होता.

Marathwada Grampanchayat Election News, Aurangabad
Devendra Fadanvis : तुमच्या नाकाखालून आम्ही सरकार घेऊन गेलो : फडणवीसांचा पलटवार

मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये थोड्या प्रमाणात का होईना सरपंच आणि ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात स्थानिक नेते, पुढाऱ्यांना यश आले आहे. (Marathwada) परंतु हे प्रमाण नगन्य असल्यामुळे खरा कस प्रत्यक्ष मतदानातूनच लागणार आहे. मराठवाड्यातील २१५९ पैकी बिनिविरोध सरपंच व सदस्यांना वगळून उद्या मतदान होणार आहे. (Aurangabad)

निवडणुकीतील नातेसंबंध, सासू-सुन, दीर-भावजय, जावा-जावा, भाऊ-बहिण हे अनेक ठिकाणी ऐकमेकांविरुद्ध लढत आहेत. अनेक गावातील पॅनलच्या हटके जाहीरनाम्याची चर्चा देखील राज्यपातळीवर झाली. अशा अनेक घटना, घडामोडी आणि काही दुःखद प्रसंगांना समोर जात मराठवाड्यातील प्रचार काल थंडावला. राज्यातील सत्तातंरानंतर सप्टेंबरमध्ये झालेल्या राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरल्याचा दावा केला गेला. तर त्याखालोखाल राष्ट्रवादी, शिवसेना, शिंदे गट आणि काॅंग्रेसला यश मिळाले होते.

आता राज्यातील साडेसात हजाराहून अधिक ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान होत आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे-फडणवीस सरकार एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहे. मराठवाड्यातील २१५९ ग्रापंचायतीसाठी (बिनविरोध वगळून) उद्या सकाळपासून मतदानाला सुरूवात होईल. गावच्या कारभारावर वर्चस्व मिळवणारे पक्षच पुढे स्थानिक स्वराज्य व लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महत्वाची भूमिका वठवणार आहेत. या शिवाय मराठवाड्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची देखील या निमित्ताने ही चाचपणी असणार आहे.

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या आठही जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडाला होता. आता या सगळ्यावर उद्याच्या मतदानातून शेवटची मोहर उठवली जाईल. मराठवाड्यातील औरंगाबाद -२०९, बीड-७०४, जालना-३०६, नांदेड-२३३, परभणी-१२८, उस्मानाबाद १६६, हिंगोली ६२ तर सर्वाधिक ३५१ लातूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. या प्रत्येक जिल्ह्यात काही सरपंच आणि सदस्य बिनविरोध झाले आहेत. पण त्याची अधिकृत घोषणाही मतमोजणीनंतरच केली जाईल.

Marathwada Grampanchayat Election News, Aurangabad
Prakash Ambedkar : महाराष्ट्राच्या सीमावादाला काँग्रेस-राष्ट्रवादी जबाबदार : आंबेडकरांचा गंभीर आरोप!

राज्यातील सत्तातंरानंतर दुसऱ्या टप्यातील या ग्रामपंचायत निवडणुकीकडे सगळ्याच राजकीय पक्षांचे लक्ष असून त्या जिंकण्यासाठी स्थानिक नेते कामाला लागले होते. सत्ताधारी पक्षाचे मराठवाड्यातील मंत्री संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजप नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडे, काॅंग्रेसचे अशोक चव्हाण, लातूरचे अमित-धीरज देशमुख आदी नेत्यांची प्रतिष्ठा या निमित्ताने पणाला लागली आहे.

जिल्हा व तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या (बिनविरोध सरपंच सदस्यांचा समावेश आहे)

औरंगाबाद : गंगापूर ३५, खुलताबाद १०, पैठण २२, फुलंब्री १८, सिल्लोड १८, वैजापूर २५, औरंगाबाद २५, कन्नड ५१, सोयगाव ५,

बीड : अंबाजोगाई ८३, आष्टी १०९, बीड १३२, धारुर ३१, गेवराई ७६, केज ६६, माजलगाव ४४, परळी ८०, पाटोदा ३४, शिरुर कासार २४, वाडवणी २५

हिंगोली : औंढा नागनाथ ७, वसमत १३, हिंगोली १६, कळमनुरी १६, सेनगाव १०

जालना : अंबड ४०, घनसावंगी ३४, जाफ्राबाद ५५, जालना २९, परतूर ४१, भोकरदन ३२, मंठा ३५

लातूर: अहमदपूर ४२, औसा ६०, चाकुर ४६, जळकोट १३, लातूर ४४, निलंगा ६८, शिरुर अनंतपाळ ११, उदगीर २६, देवणी ८, रेनापूर ३३

उस्मानाबाद : भूम २, कळंब ३०, लोहारा १३, उस्मानाबाद ४५, परांडा १, तुळजापूर ४८, उमरगा २३, वाशी ४

परभणी : गंगाखेड १३, जिंतूर ३३, मानवत ८, पालम ११,परभणी २९, पाथरी ७, पूर्णा १३, सेलू ११, सोनपेठ ३,

नांदेड : अर्धापूर २, उमरी १, कंधार १६, किनवट ५३, देगलूर १, धर्माबाद ३, नांदेड ७, नायगाव ८, बिलोली ९, भोकर ३, माहूर २७, मुखेड १५, मुदखेड १, लोहारा २८, हदगाव ६, हिमायतनगर १

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com