Latur : राजकारणी धीरज देशमुखांच्या हाती कॅमेरा ; पक्षांच्या विविध छटा केल्या कैद..

मसलगा तलावाच्या पाणथळ क्षेत्रात प्रथमच रंगीत करकोचाची वसाहत आढळली आहे. सध्या येथे सुमारे २५० रंगीत करकोचा त्यांच्या ४०० पेक्षा अधिक पिलांसह वास्तव्य करीत आहेत. (Dhiraj Deshmukh)
Latur : राजकारणी धीरज देशमुखांच्या हाती कॅमेरा ; पक्षांच्या विविध छटा केल्या कैद..
MLA Dhiraj Deshmukhs Photography In Latur, Dhiraj Deshmukhs News, Latur NewsSarkarnama

लातूर : लातूर जिल्ह्यातील मसलगा तलावाच्या पाणथळ क्षेत्रात प्रथमच रंगीत करकोचाची वसाहत आढळल्याने संबंधित स्थळाला भेट देऊन आमदार धिरज देशमुख (Dhiraj Deshmukh) यांनी पक्ष्यांच्या नानाविध छटा स्वतःच्या कॅमेरात टिपल्या. यानिमित्ताने कॅमेऱ्याच्या लेन्समधून पक्ष्यांचे सुरेल भावविश्व अनुभवत आमदार पक्षी निरीक्षणात रमल्याचे पहायला मिळाले. (Dhiraj Deshmukhs News)

राजकीय नेत्यांना आपण कॅमेरासमोर सर्रास पाहतो. पण, तोच कॅमेरा घेऊन निसर्ग आणि पक्षांचे छायाचित्र काढणारे क्विचतच. छायाचित्रण कलेवर प्रेम असल्याने धिरज देशमुख हे कॅमेरामागेही एका वेगळ्याच आत्मविश्वासाने पहायला मिळतात. (Marathwada) याआधी ते ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यात फ्लेमिंगो पक्ष्यांचे व ताडोबा अभयारण्यात वाघांचे छायाचित्र काढताना दिसले होते. आता ते लातूर (Latur) जिल्ह्यातील मसलगा तलावाच्या पाणथळ क्षेत्रात रंगीत करकोचांचे छायाचित्र टिपतांना दिसले.

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील मसलगा तलावाच्या पाणथळ क्षेत्रात प्रथमच रंगीत करकोचाची वसाहत आढळली आहे. सध्या येथे सुमारे २५० रंगीत करकोचा त्यांच्या ४०० पेक्षा अधिक पिलांसह वास्तव्य करीत आहेत. ही माहिती समजताच धिरज देशमुख यांनी संबंधित स्थळाला वन विभागाचे अधिकारी व पक्षी मित्रांसमवेत भेट दिली.

MLA Dhiraj Deshmukhs Photography In Latur, Dhiraj Deshmukhs News, Latur News
भेदरलेली शिवसेना ताकही फुंकून पिणार; आमदारांच्या मुक्कामाचे हॉटेल बदलले

या पक्ष्यांचे वास्तव्य कायम रहावे म्हणून येथील शेतकरी गुंडाप्पा धनुरे यांनी शेतातील झाडांना कुऱ्हाड लावली नाही. धिरज देशमुख यांनी यावेळी त्यांचेही आवर्जून कौतुक केले. आपल्या भागात असलेल्या या पक्ष्यांचा अधिवास व त्याचे जतन करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू. त्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in