Marathwada Cabinet Meeting : निवेदन स्वीकारायला मंत्र्यांना बोलवा; 'आदर्श'चे ठेवीदार आक्रमक, बॅरिकेड तोडले...

Aimim News : एकीकडे इम्तियाज आणि पोलिस अधिकारी यांच्यात चर्चा सुरू होती, तर दुसरीकडे मोर्चेकरी बॅरिकेड तोडून मंत्रिमंडळ बैठकीच्या दिशेने निघाले.
Marathwada Cabinet News
Marathwada Cabinet NewsSarkarnama

Aurangabad Political News : आदर्श नागरी पतसंस्था घोटाळा प्रकरणात सुरुवातीपासून ठेवीदारांच्या बाजूने मैदानात उतरलेल्या खासदार इम्तियाज जलील यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीवर ठेवीदारांचा मोर्चा काढला. (Marathwada Cabinet News) परंतु पोलिसांनी हा मोर्चा भडकल गेट येथे रोखला. या वेळी उपस्थित इम्तियाज जलील यांनी पोलिसांना `आम्हाला निवेदन देण्यासाठी मंत्रिमंडळाला भेटू द्या`, असा आग्रह धरला. या प्रसंगी ठेवीदार आणि उपस्थित मोर्चेकरी चांगलेच आक्रमक झाले.

Marathwada Cabinet News
Imtiaz Jaleel On Cabinet Meeting : सरकारला जनतेशी देणेघेणे नाही, नामांतराचे राजकारण करून फक्त सत्ता टिकवायची आहे..

एकीकडे इम्तियाज (Imtiaz Jaleel) आणि पोलिस अधिकारी यांच्यात चर्चा सुरू होती, तर दुसरीकडे मोर्चेकरी बॅरिकेड तोडून मंत्रिमंडळ बैठकीच्या दिशेने निघाले. यामुळे बराच गोंधळ उडाला आणि पोलिसांनी मोर्चेकरांना रोखण्यासाठी बाळाचा वापर केला. (Aimim) मोर्चेकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे पोलिस कर्मचारी, महिला कर्मचाऱ्यांनी मोर्चेकर्‍यांना मागे रेटण्याचा प्रयत्न केला. या वेळी थोडी बाचाबाचीही झाली.

यावर इम्तियाज जलील यांनी एक तर ठेवीदारांचे निवेदन स्वीकारण्यासाठी संबंधित मंत्र्याला इथे बोलवा, नाहीतर आम्हाला मंत्र्यांकडे घेऊन चला अशी भूमिका घेतली. (Marathwada) त्यानंतर मोर्चेकरी अधिकच आक्रमक झाले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. मोर्चेकर्‍यांपैकी काहींनी सरकारला आमचे पैसे परत मिळाले नाही तर आत्महत्या करू, असा इशाराही दिला. त्यामुळे आदर्श पतसंस्थेच्या ठेवीदारांनी काढलेला मोर्चा कुठल्याही परिस्थितीत पुढे जाऊ द्यायचा नाही, अशी तयारी पोलिसांनी सुरू केली आहे.

ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून मोर्चेकर्‍यांना माघारी फिरण्याचे आवाहन पोलिस करत होते. आदर्श घोटाळा प्रकरणात निघालेल्या या मोर्चाला सुरुवातीला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतर इम्तियाज जलील यांनी सिटी चौक पोलिस स्टेशनवर मोर्चा नेण्याची घोषणा केली. तेव्हा कुठे भडकल गेटपर्यंत मोर्चा काढण्यास परवानगी मिळाली. मात्र, भडकल गेट येथे मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्यानंतर पोलिस आणि मोर्चेकर्‍यांमध्ये बाचाबाचीला सुरुवात झाली.

त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीच्या मार्गावर लावण्यात आलेले बॅरिकेड तोडून मोर्चेकरी पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. या वेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये वादावादी झाली, तर इम्तियाज जलील यांनी निवेदन स्वीकारण्यासाठी मंत्र्यांना बोलवा नाहीतर आम्हाला तिकडे जाऊ द्या, अशी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in