Beed : जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेवर विशेष बैठक बोलवा; पंकजा मुंडेंचे गृहमंत्र्यांना पत्र

चोऱ्या, खून, मारामाच्या महिलांवर अत्याचार, खंडणी वसुली, तलवारी, रिव्हॉल्व्हर अशा घातक शस्त्रास्त्रांचा वापर सर्रास होताना दिसून येत आहे. (Pankaja Munde)
Pankaja Munde-Dilip Walse Patil
Pankaja Munde-Dilip Walse PatilSarkarnama

बीड : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर वारंवार प्रश्न उपस्थित करत पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधणाऱ्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) पुन्हा एकदा हा मुद्दा उपस्थित केला आहे. बीड (Beed) जिल्ह्यात गुन्हेगारी कारवाया, महिलांवरील अत्याचाराच्या व इतर घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. (Bjp) गुन्हेगांरांना पोलिसांचा धाक राहिला नसून सामान्य नागरिक दहशतीच्या सावटाखाली वावरत असल्याचा आरोप करत पंकजा मुंडे यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र पाठवले आहे.

जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेवर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची विशेष बैठक बोलवा, अशी मागणी देखील पंकजा यांनी या पत्राद्वारे केली आहे. बीड जिल्ह्यातील राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. एकीकडे क्षीरसागर घराण्यातील भाऊबंदकीचा टोकाला गेलेले वाद, तर दुसरीकडे धनंजय आणि पंकजा मुंडे या बहिण भावांमधील राजकीय कुरघोडी. या सर्वांमध्ये मात्र भरडली जातेय ती बीडमधील जनता.

गेल्या काही महिन्यात बीड मधील गुन्हेगारी कारवायांमध्ये कमालीची वाढ झाली. कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. गुटखा, वाळुमाफिया, शस्त्रांचा धाक दाखवून सरकरारी अधिकाऱ्यांना धमकावणे, महिलांवरील अत्याचारांचे प्रकार देखील वाढले. पंकजा मुंडे यांनी या विषयावर अनेकदा आपली भूमिका मांडत जिल्ह्यात माफियाराज सुरू असल्याचा आरोप केला होता. पंरतु या परिस्थीत सुधारणा होण्याऐवजी ती अधिकच बिघडत असल्याचे दिसते.

या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी थेट राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाच पत्र पाठवून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे. मुंडे यांनी पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्हयातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, त्याला कारणही तसेच आहे. गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना जिल्हयात मोठया प्रमाणात वाढल्या आहेत. चोऱ्या, खून, मारामाच्या महिलांवर अत्याचार, खंडणी वसुली, तलवारी, रिव्हॉल्व्हर अशा घातक शस्त्रास्त्रांचा वापर सर्रास होताना दिसून येत आहे.

Pankaja Munde-Dilip Walse Patil
Osmanabad : जिल्हा बॅंकेनंतर मतदारसंघातील निवडणुकीतही राणा पाटलांना दणका

बीड, परळी, अंबेजोगाई, माजलगांव, गेवराईसह सर्वच तालुक्यात गुन्हेगारांनी हैदोस मांडला आहे. पोलिसांचा कसलाही धाक अथवा नियंत्रण राहिले नाही. जिल्हयात पोलिस यंत्रणा आहे की नाही? असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे. गुन्हेगारीच्या वाढत्या घटना जिल्हयासाठी अतिशय चिंताजनक बाब बनली आहे. अशा घटना गंभीरतेने घेण्याची गरज निर्माण झाली आहे. बीडच्या कायदा सुव्यवस्था विषयावर सर्व संबंधित अधिकाऱ्यांची स्वतंत्र व विशेष बैठक घेऊन गुन्हेगारांच्या विरोधात कठोर पावले उचलावीत आणि परिस्थिती नियंत्रणात आणून सर्व सामान्य नागरिकांच्या मनातील भिती दूर करावी असे पत्र पंकजा मुंडे यांनी लिहिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com