...तर धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरेंकडेच : जयंत पाटलांचे सूचक वक्तव्य

Jayant Patil : 'शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह हायजॅक करण्याचे प्रयत्न शिवसेनेतून फुटून गेलेले लोक करत आहेत.
Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama

हिंगोली : राज्यातील सत्तासंघर्षाचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहचला आहे. शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट आमने सामने आहेत. खरी शिवसेना कोणाची? याचा निर्णय आता महत्त्वाच्या वळणावर आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या चाळीस आमदारांना सोबत घेऊन, निवडणूक आयोगासमोर उपस्थित होणार आहेत. त्यामुळे आता धनुष्यबाण हे पक्षाचं चिन्ह (Shivsena) नेमकं कोणत्या गटाला मिळणार? याची चर्चा सुरू झाली आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

जयंत पाटील (Jayant Patil)सद्या हिंगोली जिल्ह्यात दौऱ्यावर आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. धनुष्यबाण चिन्ह नेमक्या कोणत्या गटाला मिळणार? असा प्रश्न विचारले असता, यावर पाटील म्हणाले, 'शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह हायजॅक करण्याचे प्रयत्न शिवसेनेतून फुटून गेलेले लोक करत आहेत, मात्र निवडणूक आयोगावर कुणाचा प्रभाव नसेल, तर शिवसेना पक्ष आणि चिन्ह उध्दव ठाकरे यांच्या कडेच राहील'

Jayant Patil
Jalgaon Politics|गुलाबरावांची गाडी सुसाट ; दसरा मेळाव्यावरुन शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल

खरी शिवसेना कोण? शिवसेना नेमकी कोणाची? धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं ? यासंदर्भात निवडणूक आयोगात उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात (Ekntah Shinde) निवडणूक आयोगाच्या पायरीवर वाद सुरू आहे. निवडणूक आयोगासमोर एकनाथ शिंदे आपल्या गटातील आमदारांना हजर करणार आहेत. आपणच खरी शिवसेना असल्याचे एकनाथ शिंदे निवडणूक आयोगासमोर दावा करणार आहेत.

खरी शिवसेना कोण ? धनुष्यबाण चिन्हावर अधिकार कोणाचा? यावरून निवडणूक आयोगासोबतच आणि सुप्रीम कोर्टात यावर मागील काही दिवसांपासून सुनावणी सुरूआहे. यासाठी सुप्रीम कोर्टाने विशेष घटनापीठाचीही नेमणूक केली आहे. आता आगामी महापालिका निवडणुका अगदी जवळ येऊन ठेपलेल्या आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत धनुष्यबाण चिन्ह आपल्याकडेच राहावं, यासाठी शिवसेना आणि शिंदे गट या दोघांचाही प्रयत्न असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in