मातोश्रीवरून निरोप येताच खासदार प्रताप जाधव बांधावरून थेट मुंबईकडे रवाना

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यात खळबळ उडालेली असताना बुलडाण्याचे खासदार प्रताप जाधव मात्र खरीपाच्या पेरणीत व्यस्त होते.
मातोश्रीवरून निरोप येताच खासदार प्रताप जाधव बांधावरून थेट मुंबईकडे रवाना

बुलडाणा : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे राज्यात खळबळ उडालेली असताना बुलडाण्याचे खासदार प्रताप जाधव (Pratap Jadhav) मात्र खरीपाच्या पेरणीत व्यस्त होते. मातोश्रीवरून त्यांना तातडीच्या बैठकीसाठी फोन येताच खासदार जाधव हे तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत. (Buldana MP Pratap Jadhav leaves for Mumbai)

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेत बंड करून गुजरातमध्ये पोचले आहेत. त्यांच्यासोबत तब्बल ११ आमदार असल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आले आहे. दुसरीकडे, शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अजय चौधरी यांना संधी देण्यात आली आहे.

मातोश्रीवरून निरोप येताच खासदार प्रताप जाधव बांधावरून थेट मुंबईकडे रवाना
बंडानंतर एकनाथ शिंदेंचे प्रथमच ट्विट; उद्धव ठाकरेंना दिला अप्रत्यक्ष हा इशारा !

राज्यात महाविकास आघाडीतील ज्येष्ठ मंत्री असलेले एकनाथ शिंदे हे काही आमदारांना घेऊन बंडाचे निशाण उभारले आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आलेला असताना बुलडाण्याचे शिवसेना खासदार प्रताप जाधव मात्र आपल्या शेतात खरिपाच्या पेरणीत व्यस्त होते. आज सकाळीच खासदार प्रताप जाधव हे आपल्या शेतात पोहोचून ट्रॅक्टरद्वारे पेरणी करत होते.

मातोश्रीवरून निरोप येताच खासदार प्रताप जाधव बांधावरून थेट मुंबईकडे रवाना
विधानभवनात पोचताच उद्धव ठाकरेंनी विचारले होते ‘एकनाथ कुठे आहेत?’

दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांच्या बंडाची बातमी जशी खासदार प्रताप जाधव यांना समजली, तसे ते मेहकर शहरात पोचले. त्यांना फोनरुन ही माहिती मिळाली. शेतात असतानाच जाधव यांना मातोश्रीवरून फोन आला. त्यानंतर तातडीच्या बैठकीसाठी खासदार प्रताप जाधव हे थेट बांधावरून मुंबईकडे रवाना झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com