Farmers Leader Join BRS News : परभणीतही बीआरएसचा प्रभाव, शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश..

Shetkari Sanghtana : राज्यभरातील दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांनी केसीआर यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला.
Farmers Leader Join BRS News
Farmers Leader Join BRS NewsSarkarnama

Marathwada : शेतकऱ्यांशाठी काम करण्याच्या उद्देशाने आपल्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) चा विस्तार करण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K.Chandrashekhar Rao) यांनी नांदेडमार्गे महाराष्ट्रात एन्ट्री केली. नांदेड जिल्ह्यातील अनेक माजी आमदार, शेतकरी नेते, पदाधिकाऱ्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश करत उत्फूर्त प्रतिसाद दिला. आता या पक्षाचा परभणीत देखील प्रभाव वाढत असल्याचे समोर आले आहे.

Farmers Leader Join BRS News
Ashok Chavan On Surat News : अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आलीच आहे, आता मुक्त भ्रमणाचा अधिकारही काढणार का ?

शेतकरी संघटनेचे सुधीर बिंदू यांनी आपल्या समर्थकांसह नुकताच भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला. (Parbhani) यावेळी त्यांचे स्वागत करताना मुख्यमंत्री चंद्रशेखरराव व इतर पदाधिकाऱ्यांनी केले. (Marathwada) महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या सुधीर बिंदू यांच्यासह शेतकरी संघटनेतील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला.

बिंदू यांच्यासह उपाध्यक्ष कैलास तवार, मराठवाडा विभाग प्रमुख रामजीवन बोंदर, महिला आघाडीच्या सुवर्णा काटे यांच्यासह राज्यभरातील दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांनी केसीआर यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला.

यावेळी तेलंगाणाचे अर्थमंत्री हरीश राव, मंत्री सत्यवथी राठोड, बी. बी. पाटील, आमदार जीवन रेड्डी, आमदार बालका सुमन, किसान समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष गुरुनाम चुडणी यांच्यासह तेलंगणा सरकारमधील अनेक मंत्री, खासदार व आमदार उपस्थित होते.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर शहरातून राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले कदीर मौलाना, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष अभय पाटील चिकटगांवकर यांनी देखील केसीआर यांचे नेतृत्व स्वीकारत पक्षात प्रवेश केला. हैदराबादेत या सर्वांना केसीआर यांनी शंकरअण्णा धोंडगे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com