शेतकऱ्यांना निराशेच्या गर्तेतून बाहेर काढा, आत्मविश्वास वाढवा ; राज्यपालांचा कृषी मंत्र्यांना सल्ला

शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून एक दिवस माझ्या बळीराजासोबत हे अभियान सुरू करण्यात आले. (Minister Abdul Sattar)
Minister Abdul Sattar With Governor Bhgatsingh Koshayri News
Minister Abdul Sattar With Governor Bhgatsingh Koshayri NewsSarkarnama

मुंबई : अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे अडचणीत सापडलेल्या बळीराजाला, या गर्तेतून बाहेर काढणे गरजेचे आहे. त्यासाठी त्याला योग्य ती मदत करून, त्याच्यात आत्मविश्वास निर्माण करा, असा सल्ला राज्यपाल भगतसिंग कोशारी (Bhagat Shingh Koshayri) यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना दिला. अब्दुल सत्तार यांनी विदर्भ आणि मराठवाड्याच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी दौरे केल्यानंतर आज राजभवनात राज्यपालांची भेट घेतली.

शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून एक दिवस माझ्या बळीराजासोबत हे अभियान सुरू करण्यात आले. (Mahrashtra) स्वतः सत्तार यांनी एक आणि दोन सप्टेंबर रोजी अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्याच्या साद्रावाडी गावात एक दिवस शेतकऱ्यांसोबत घालवत त्याच्या समस्या अडचणी जाणून घेतल्या.

त्या अडचणींवर काय मार्ग निघू शकतो या विषयावर त्यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी कोश्यारी यांनी सत्तार यांच्या अभियानाची प्रशंसा करून काही नवीन बाबींचा समावेश करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.

Minister Abdul Sattar With Governor Bhgatsingh Koshayri News
Shivsena : नवनीत राणांचा उल्लेख `सिगारेट पिणारी बाई` असा करत खैरेंची टीका..

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी त्याची खरी कारणे काय आहे हे जाणून घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी विशेष आराखडा तयार करण्याचे कोश्यारी यांनी सांगितले. चिंताग्रस्त शेतकऱ्यांशी सरकारी अधिकाऱ्यांनी वेळोवेळी संवाद साधून अडचणी सोडविल्या पाहिजे. तसेच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही कोश्यारी यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com