Dhananjay Munde Car Accident: राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंच्या गाडीला अपघात

गेल्या आठवड्यातच भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात झाला होता
Dhananjay Munde
Dhananjay Munde Sarkarnama

Dhananjay Munde Accident News : भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात झाला. ही घटना ताजी असतानाच आता परळीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. वाहनचालकाचा ताबा सुटल्याने मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला. यात त्यांच्या छातीला किरकोळ मार लागला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (४ जानेवारी) रात्री पावणे तीन वाजण्याच्या सुमारास परळीतील आझाद चौकात धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात झाला. यावेळी धनंजय मुंडे स्वतः गाडी चालवत होते. पण अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही.

Dhananjay Munde
Mahavitaran Strike: ...तर 'मेस्मा' कायद्याअंतर्गत वीज कर्मचार्यांवर कारवाई; राज्य सरकारचा इशारा

दरम्यान, धनंजय मुंडे यांना उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांच्या छातीला मार लागल्यामुळे पुढील उपचारांसाठी त्यांना मुंबईला हलवण्यात येणार असल्याचीही माहिती आहे. धनंजय मुंडे यांना परळीतून लातूरमध्ये नेलं जाईल आणि तिथून विशेष विमानाने त्यांना मुंबईतील रुग्णालयात उपचारांसाठी हलवलं जाणार आहे.

हिवाळी अधिवेशनादरम्यान भाजप आमदार जयकुमार गोरे यांचा अपघात झाला होता. नागपूरहून त्यांच्या गावी साताऱ्याला जात असतानाच त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. त्या अपघातानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहातच आपल्या आमदारांना रात्रीच्या वेळी प्रवास न करण्याचा सल्ला दिला होती. पण त्यानंतरही धनंजय मुंडे यांनी त्यांच्या सल्ल्याकडे कानाडोळा केल्याचे दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in