Parbhnai APMC Result News : बोर्डीकरांनी जिंतूर-बोरीत विजय मिळवला, जिल्ह्यात महाविकास आघाडीचीच सरशी..

Mahavikas Aghadi : सात पैकी केवळ २ ठिकाणी भाजप प्रणित पॅनलला यश मिळाले. तर चार महाविकास आघाडीच्या ताब्यात.
Parbhani APMC Election News
Parbhani APMC Election NewsSarkarnama

Marathwadada : जिंतूरच्या भाजप आमदार मेघाना बोर्डीकर-साकोरे यांनी आपल्या मतदारसंघातील जिंतूर आणि बोरी बाजार समितीत दणदणीत विजय मिळवला. जिल्ह्यात मात्र भाजपची कामगिरी निराशाजनक राहिली. सात पैकी केवळ २ ठिकाणी भाजप प्रणित पॅनलला यश मिळाले. तर उर्वरित चार बाजार समितीत्या (Parbhnai APMC) महाविकास आघाडीच्या ताब्यात आल्या आहेत. तर ताडकळस बाजार समितीमध्ये दोन्ही पॅनलला समसमान जागा मिळाल्या आहेत.

Parbhani APMC Election News
Dhnanjay Munde On Beed APMC : सरकार निवडणुका का घेत नाही ? याचे गुपित आजच्या निकालात दडले आहे..

परभणी जिल्ह्यातील ११ बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. पैकी पहिल्या टप्यात सात बाजार समित्यांची मतदान प्रक्रिया शुक्रवारी (ता.२८) पार पडली. (Bjp) त्याचे निकाल आज जाहिर झाले. यात परभणी, गंगाखेड, सेलू, पूर्णा, ताडकळस, जिंतूर व बोरी या बाजार समित्यांचा समावेश आहे. आज जाहिर झालेल्या बाजार समित्यांच्या निकालामध्ये चार (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडी प्रणित पॅनलने जिंकल्या.

यात (Parbhani) परभणीत महाविकास आघाडीला १२, भाजप ४ तर अपक्षांना २ ठिकाणी विजय मिळाला. गंगाखेडमध्ये महाविकास आघाडीला ११, भाजप-रासप ७, सेलूमध्ये महाविकास आघाडीकडे १०, भाजप ६, अपक्षांकडे २ जागा गेल्या. पूर्णेत महाविकास आघाडीला १५, तर भाजप-रासपला केवळ ३ जागा मिळाल्या. तर ताडकळस बाजार समितीमध्ये भाजप- रासप प्रणित पॅनलला ९ , कॉग्रेस ६ व राष्ट्रवादीला ३ जागा मिळाल्या आहेत.

जिंतूरमध्ये भाजपला १४, महाविकास आघाडीला ४ व बोरी बाजार समितीमध्ये भाजपला १२ तर महाविकास आघाडीकला ६ जागा मिळाल्या आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप-शिंदे अशी थेट लढत होती. तर काही ठिकाणी महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे पहायला मिळाले होते.

परभणीत खासदार संजय जाधव, काॅंग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर, राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे, जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबाजानी दुर्राणी, भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर या नेत्यांनी शक्तीपणाला लावली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com