अमरावतीत बोंडेवरच गुन्हा दाखल आहे, त्यांनी नांदेडात येऊन शहाणपणा शिकवू नये

(Ashok Chavan Said, Bonde should check his mental health)राज्यात मंत्री राहिलेल्या व्यक्तीने अशा बेजबादारपणाचे विधान करणे योग्य नाही, बोंडे यांनी आपले मानसिक स्वास्थ तपासले पाहिजे
अमरावतीत बोंडेवरच गुन्हा दाखल आहे, त्यांनी नांदेडात येऊन शहाणपणा शिकवू नये
Ashok Chavan-Anil BondeSarkarnama

नांदेड ः अमरावतीत ज्या अनिल बोंडेवर दंगल प्रकरणी विविध कलमांखाली गुन्हा दाखल आहे, त्यांनी नांदेडात येऊन आम्हाला शहाणपणा शिकवू नये. राज्यात मंत्री राहिलेल्या व्यक्तीने अशा बेजबादारपणाचे विधान करणे योग्य नाही, बोंडे यांनी आपले मानसिक स्वास्थ तपासले पाहिजे, अशा शब्दात सार्वजनकि बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडे यांचा समाचार घेतला.

राज्यातील नांदेड, अमरावती, मालेगाव येथे घडलेल्या हिंसक घटनेचा निषेध व त्यांनतर भाजपच्या कार्यकर्ते, नेत्यावर गुन्हे दाखल करून सुरू असलेल्या धरपकडीच्या निषेधार्थ भाजपने नांदेडमध्ये महाविकास आघाडी सरकारच्या विरोधा निदर्शने केली. माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्या नेतृत्वाखाली नांदेडात ही निदर्शने झाली, खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे देखील यावेळी उपस्थित होते.

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना अनिल बोंडे यांनी थेट महाविकास आघाडीवर नांदेडात दंगल घडवल्याचा आरोप केला. राज्य सरकारचे अपयश, घोटाळे यावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच १२ नोव्हेंबर रोजीची दंगल तुम्ही घडवली का? असा सवाल बोंडे यांनी केला? बोंडे यांच्या या आरोपाला अशोक चव्हाण यांनी उत्तर दिले. बोंडे यांनी आपले मानसिक स्वास्थ तपासून घ्यावे, असा टोला चव्हाण यांनी लगावला.

Ashok Chavan-Anil Bonde
विकासकामांत गडबड आढळली तर थेट तक्रार करा, आम्ही त्यांचा बंदोबस्त करू

प्रसार माध्यमांशी बोलतांना अशोक चव्हाण म्हणाले, अनिल बोंडे हे भाजप सरकारमध्ये मंत्री राहिलेले आहेत, अशा जबादार व्यक्तीने बेजबाबदारपणाचे विधान करावे याचे आश्चर्य वाटते. मुळात ज्या अमरावती शहरात दंगल अधिक भडकली, तिथेच बोंडे यांच्या विरोधात विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांनी इथे नांदेडात येऊन शहाणपणा शिकवू नये.

अमरावतीत जाऊन तिथे शांतता कशी नांदेल याकडे लक्ष द्यावे. दंगली घडवून निवडणूका जिंकायच्या हे भाजपचे धोरण असू शकेल. आम्हाला राज्यात व देशात जातीय सलोखा हवा आहे. काॅंग्रेसने सातत्याने हेच प्रयत्न देशात आणि राज्यात केले आहेत. त्यामुळे बोंडे यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आणि हास्यास्पद आहेत, असेही चव्हाण म्हणाले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in