Ajit Pawar Beed Sabha : काळे झेंडे ते रिकाम्या खुर्च्या ; अजित पवारांच्या सभेत काय घडले ?

Beed Politics : बीडचा दुष्काळ कायमचा संपवणारी सभा म्हणून या सभेचा चांगलाच गाजावाजा झाला
Ajit Pawar Beed Sabha News
Ajit Pawar Beed Sabha NewsSarkarnama

Beed Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रविवारी बीडमध्ये जंगी सभा पार पडली. पण या सभांमधून राज्य सरकार बीडसाठी महत्त्वाच्या घोषणा करेल, या आशेने नागरिकांनी या सभेला सुरूवातीला गर्दी केली, पण काही वेळातच लोकांनी या सभेकडे पाठ फिरवल्याचे दिसून आहे. यातून बीडकरांनी राज्यसरकारला आपली नाराजी स्पष्टपणे दाखवल्याचे दिसत आहे.

त्याचं झालं असं की, अजित पवारांच्या स्वागताला मोठी गर्दीही जमली,ते बीडमध्ये दाखल झाले, तेव्हा कार्यकर्त्यांनी जल्लोष करत त्यांचं स्वागत केलं. पण मंत्री धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्या ताफ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवत निषेधही व्यक्त केला. सभेत जेव्हा अजित पवारांनी भाषण करायला सुरुवात केली, तेव्हा अनेक लोकांनी त्यांच्या भाषणाकडे पाठ फिरवत खुर्च्या रिकाम्या केल्या.

Ajit Pawar Beed Sabha News
Gadakh Vs Vikhe : गडाख-विखे पुन्हा एकदा लढत ? नगर दक्षिणेतून लोकसभेसाठी आघाडीत गडाखांच्या नावावर एकमत..

बीडचा दुष्काळ कायमचा संपवणारी सभा म्हणून या सभेचा चांगलाच गाजावाजा झाला. मात्र मंत्र्यांची भाषणे सुरू होऊन बराच वेळ झाला तरी बीडकरांसाठी कोणतीही महत्वाची घोषणा नाही. दुष्काळ संपवण्याबाबत कोणतीही घोषणा झाली नाही. पण, दादांच्या भाषणावेळी अनेक खुर्चा रिकाम्याच झाल्याचे पाहायला मिळाले.

दुसरीकडे, अमरसिंह पंडितांच्या सभेदरम्यान लोकांचा गोंधळ पाहायला मिळाला. पंडितांनी जवळपास ३ वेळा शांततेच आवाहन केलं. पण लोक सभा सोडून जात होते. मंत्री धनंजय मुंडे यांच्या भाषणानंतर लोकं खुर्च्या रिकाम्या करायला लागले. त्यावेळी मुंडेंनी हात जोडून शेवटपर्यंत सभा न सोडण्यासाठी विनंतीही केली. पण लोकांनी मात्र सभेतून काढता पाय घेतला.

Ajit Pawar Beed Sabha News
Praniti Shinde : काँग्रेस सोलापुरातील पराभवाचा बदला घेण्याच्या तयारीत; 'भावी खासदार'चा झळकला 'बॅनर' !

लोकांचा गोंधळ सुरू असताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच भाषण कधी सुरू झाले आणि संपले हेच कळलंच नाही. प्रफुल्ल पटेलांचही भाषण असंच गोंधळातच झालं. त्यानंतर छगन भुजबळांच्याही भाषणादरम्यान देखील लोकांमध्ये गोंधळ सुरूच होता. त्यामुळे त्यांनाही भाषण आटोपते घ्यावे लागले.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in