भाजपचे संकटमोचक म्हणतात, सरकार पडेल की नाही? हे सांगता येणार नाही

(The state government has no sympathy left, Syas Girish Mahajan)आमच्या काळात ९० टक्के पुर्ण झालेली कामे, या सरकारने पुढे तशीच ठेवली, दहा टक्के कामे देखील त्यांना करता आली नाही.
Bjp Mla Girish Mahajan
Bjp Mla Girish MahajanSarkarnama

औरंगाबाद ः राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार मार्चमध्ये पडणार असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नुकताच केला होता. त्यानंतर पुन्हा राज्यात सरकार पडणारच्या चर्चा सुरू आहेत. पण भाजपमध्ये संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे.

मार्चमध्ये सरकार पडणार की नाही? हे सांगता येणार नाही, असे महाजन म्हणाले. औरंगाबादेत पत्रकारांशी बोलतांना महाजन यांनी राणे यांच्या विधानावर थेट बोलणे टाळले, मात्र मार्चमध्ये राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडेल की नाही? हे सांगता येणार नाही, असे सांगितले.

शिवाय भाजपकडून किंवा केंद्राकडूनही अशा प्रकारचे कुठलेच प्रयत्न सुरू नाहीत. आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बाजवू, असे महाजन म्हणाले. राज्यातील सरकारला संवेदनाच राहिलेल्या नाही, सगळ्याचा आघाड्यांवर हे सरकार अपयशी ठरले आहे. विकासाची कामे, महत्वाचे प्रकल्प रखडले आहेत.

पाटबंधारे विभागांतर्गत सध्या एकही काम सुरू नाही, आमच्या सरकारच्या काळात फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आम्ही हाती घेतलेली सर्व कामे पुर्ण केली होती, असा दावा महाजन यांनी केला.

Bjp Mla Girish Mahajan
महापालिका, नगर परिषदेत भाजपचाच डंका; विरोधकांचा सुफडा साफ

शिवाय आमच्या काळात ९० टक्के पुर्ण झालेली कामे, या सरकारने पुढे तशीच ठेवली, दहा टक्के कामे देखील त्यांना करता आली नाही. परिणामी शेतकऱ्यांना त्याचा लाभ होतांना दिसत नाहीये. बांधापर्यत पाणी पोचत नाही, वीज बीलाची वसुली जुलमी पद्धतीने केली जात असल्याचा आरोपही महाजन यांनी यावेळी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com