Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंचा ताफा अडवला; चंद्रकांत पाटलांच्या माफीनंतरही आंदोलनं सुरुच

Chandrashekhar Bawankule News : बावनकुळे यांना काळे झेंडे दाखवण्यात आले
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama

Chandrashekhar Bawankule News : भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज परभणी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांचा ताफा काही संघटनाकडून अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे परभणीत काही वेळ तणावाच वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा आता बावनकुळे यांना देखील फटका बसला असल्याचं पाहायला मिळालं आहे.

भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काही दिवसांपूर्वी महात्मा जोतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याच्या निषेधार्थ परभणी (Parbhani) शहरात आज काही संघटनांकडून निषेध व्यक्त करत भाजपविरोधी जोरदार आंदोलन करण्यात आलं.

Chandrashekhar Bawankule
Satara Election News: ४९ ग्रामपंचायती बिनविरोध; २४२ पंचायतीत राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना भिडणार

यावेळी बावनकुळे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करत त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. मात्र आंदोलक आक्रमक होताच पोलिसांनी तत्काळ त्यांच्यावर नियंत्रण मिळवलं. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बराच वेळ बाचाबाची देखील झाली. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या दौऱ्यानिमित्त शहरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी लगेच आंदोलकांवर नियंत्रण मिळवलं.

Chandrashekhar Bawankule
Gunratna Sadavarte: ''...म्हणून खासदार उदयनराजेंना अटक करा!''; गुणरत्न सदावर्ते असं का म्हणाले?

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांनी जाहीर माफी देखील मागितली. मात्र तरी देखील त्यांना रोषाला सामोर जावं लागत असल्याचं पाहायला मिळत आहे. चंद्रकांत पाटील यांनी माफी मागितल्यानंतरही काही संघटनांकडून आज आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे आता तरी हा वाद मिटणार का? असा सवाल करण्यात येत आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांना राज्यपाल पदावरून हटवण्याची मागणी करत आज पुण्यात बंद पाळण्यात आला. तसेच कोश्यारी यांच्या निषेधार्थ पुण्यात मूक मोर्चा ही काढण्यात आला. तर परभणीत भाजपविरोधी जोरदार आंदोलन करण्यात आलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com