ईडी लाव, नाही तर काडी लाव ; पण तुला जेलची हवा खायला लावणार

सोळंके यांची ईडीकडून चौकशी करायला लावू, असे म्हणत भाजपच्या राजाभाऊ मुंडे यांनी खुले आव्हान दिले होते. (Beed District)
Prakash Solanke- Rajabhau Munde

Prakash Solanke- Rajabhau Munde

Sarkarnama

बीड : ईडी चौकशीची धमकी देणाऱ्या भाजपच्या नेत्याला माजलगांवचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळुंके (Prakash Solanke) यांनी जशास तसे उत्तर देत थेट जेलची हवा खायला पाठवणार असल्याचे सांगत आव्हान दिले आहे. (Ncp)वडवणी नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने रंगलेल्या आरोप-प्रत्योरापाच्या कलगितुऱ्यात भाजपचे राजाभाऊ मुंडे आणि आमदार प्रकाश सोळुंके एकमेकांना भिडले आहेत.

जिल्ह्यातील पाच नगर पंचायतींच्या निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्यात असतांनाच त्यातील आरोप-प्रत्यारोपांना चांगलीच धार आली आहे. जेल, ईडी, दहशहत असे मुद्दे उपस्थित करत विरोधक एकमेकांवर हल्ले चढवत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी वडवणी नगर पंचायतीची निवडणुक प्रतिष्ठेची केली आहे.

सोळंके यांची ईडीकडून चौकशी करायला लावू, असे म्हणत भाजपच्या राजाभाऊ मुंडे यांनी खुले आव्हान दिले होते. तर त्यावर पलटवार करतांना मुंडे यांनाच पुन्हा एकदा जेलमध्ये घालणार, असा इशारा सोळंके यांनी दिला आहे. माजलगाव मतदार संघातील वडवणी नगर पंचायत भाजपच्या ताब्यात आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ मुंडे यांच्या पत्नी मंगला मुंडे नगराध्यक्षा होत्या. या नगर पंचायतीमध्ये सत्तांतर करण्यासाठी प्रकाश सोळंके यांनी चंग बांधला आहे. सोळंके व पुतणे सभापती जयसिंह सोळंके वडवणीत सध्या तळ ठोकून आहेत. भाजपचे माजी आमदार केशव आंधळे यांनाही त्यांनी आपल्या गोटात घेतले आहे.

दरम्यान, एका सभेत राजाभाऊ मुंडे यांनी प्रकाश सोळंके यांची ईडीकडून चौकशी लावण्याची धमकी दिली. त्यानंतर प्रकाश सोळंके चांगलेच भडकले, मग त्यांनीही ईडी लाव नाही तर काडी लाव, पण राजाभाऊ मुंडेला जेलची हवाच खायला लावणार असा इशारा दिला.

<div class="paragraphs"><p>Prakash Solanke- Rajabhau Munde</p></div>
लग्न कधी करायचे, मुल जन्माला कधी घालायची हे मोदींनी ठरवू नये..

यापूर्वी जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात दोन वर्षे फरार आणि दिड वर्षे जेलमध्ये राहीलेल्या मुंडेला पुन्हा एकदा वडवणी नगर पंचायत भ्रष्टाचार प्रकरणात जेलमध्येच घालणार. वडवणी नगर पंचायतीचे लेखा परीक्षण अहवाल आपल्या हाती आले असून यात अनेक गंभीर अक्षेप नोंदविल्याचेही प्रकाश सोळंके म्हणाले.

आपण ४०० कोटींचा निधी मिळवून केलेल्या कुंडलिका धरणावरुन वडवणीला पाणी मिळते, आणि आपल्याला विचारले जाते विकास काय केला. अरे, लायकी तरी आहे का मी काय केले हे विचारायची, कुंडलिका धरणात बुडवू असाही संपातही सोळंके यांनी यावेळी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com