Patoda Bazar Samiti : पाटोदा-शिरुर बाजार समितीच्या मतदान केंद्रावर भाजप कार्यकर्ते-पोलीस भिडले

Bazar Samiti Result : सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप रिंगणात
Patoda APMC
Patoda APMCSarkarnama

Beed APMC Result : बीड जिल्ह्यातील पाटोदा-शिरूर संयुक्त बाजार समितीवर भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांत वाद झाला. यामुळे चिडलेल्या पोलिसांनी लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. त्यामुळे या मतदानकेंद्रावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, आमदार सुरेश धस यांनी मध्यस्थी केल्याने येथील स्थिती नियंत्रणात आली. त्यानंतर काही वेळाने मतदान सुरळीत सुरू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

Patoda APMC
Bazar Samiti Election Result 2023: राज्यातील दिग्गजांचे बुरुज ढासळले : बाजार समितीच्या सत्तेतून अनेक प्रस्थापित नेते हद्‌पार

बीड जिल्ह्यातील (Beed) १० पैकी ९ बाजार समित्यांच्या निवडणुका (Market Committee Elections) प्रथमच एकाच वेळी होत आहेत. या बाजार समित्यांवर आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि भाजपने मोठी तयारी केल्याचे दिसून आले. या बाजार समित्यांतील आठ बाजार समित्यांसाठी शुक्रवारी (ता. २८) मतदान झाले. तर रविवारी (ता. ३०) माजलगांव, पाटोदा-शिरूर बाजार समितीसाठी मतदान होत आहे.

Patoda APMC
Pusad APMC Result News : ८१व्या वर्षीही माजी मंत्री मनोहर नाईकांचा करिष्मा कायम !

या बाजार समितीसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू झाले. मतदारांनी मात्र दहा वाजल्यानंतर मतदान केंद्रावर येण्यास सुरूवात केली. त्यावेळी भाजपचे (BJP) काही कार्यकर्तेही तेथे उपस्थित होते. त्यावेळी पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांत वाद निर्माण झाला. हा वाद वाढल्याने पोलिसांनी लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तेथे उपस्थित भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी मध्यस्थी केली. त्यामुळे येथील गोंधळाची स्थिती नियंत्रणात येत मतदान प्रक्रिया सुरळीत झाली. यावेळी सुरेश धस यांनी पोलीसच कार्यकर्त्यांशी चुकीच्या पद्धतीने वागले असल्याचा आरोप केला.

Patoda APMC
Akluj Bazar Samiti Result : जिद्द राहू दे मनी झुंजायची पुन्हा; मोहिते पाटलांविरुद्ध पुन्हा लढण्याची के.के.पाटलांची तयारी

पाटोदा-शिरुर (Patida-Shirur) बाजार समितीसाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रामकृष्ण बांगर (Ramkrishna Bangar) यांनी मोठा प्रचार केला आहे. त्यांच्या विरोधात भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही तगडे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे या बाजार समितीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असे चित्र निर्माण झाले आहे. या बाजार समितीसाठी दुपारी चारनंतर मतमोजणी सुरू होणार आहे. त्यानंतर ही बाजार समिती कुणाच्या ताब्यात जाईल, हे स्पष्ट होईल.

Patoda APMC
Chandwad APMC : भाजपचे आमदार डॉ. राहूल आहेर यांना काँग्रेसचा दे धक्का!

दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी चुरस असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील २५३ बाजार समित्यापैकी १४७ समित्यांसाठी शुक्रवारी (ता. २८) मतदान झाले. त्यांचा निकाल शनिवारी (ता. २९) स्पष्ट झाला आहे. यात महाविकास आघाडीच्या नेतृत्वातील गटाने आपले वर्चस्व कायम राखल्याचे दिसून आले. तर उर्वरित ८८ बाजार समित्यांसाठी रविवारी (ता. ३०) मतदान होत असून त्यांचा निकालही आजच जाहीर होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com