मला उमेदवारी द्यायची की नाही, हे भाजप ठरवेल : खासदार शृंगारेंचे विधान

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी मोठे काम केले. त्यांचाच आदर्श घेऊन आपण विकासाचे काम करत आहे.
MP Sudhakar Shrangare
MP Sudhakar ShrangareSarkarnama

लातूर : मी बोलण्यापेक्षा कामाला महत्त्व देतो. भारतीय जनता पक्षाला (BJP) मालक नाही, कामाच्या निकषावरच भाजपत उमेदवारी दिली जाते. लोकसभेच्या पुढच्या निवडणुकीत (Loksabha Election) मला उमेदवारी मिळेल की नाही, हे पक्ष ठरवेल, असे विधान लातूरचे भारतीय जनता पक्षाचे खासदार सुधाकर शृंगारे (Sudhakar Shrangare) यांनी केले. (BJP will decide whether to give me candidature or not)

रेल्वेचे कोच बनविणाऱ्या कारखान्याची उभारणी अंतिम टप्प्यात आली आहे. त्याची पाहणी केल्यानंतर खासदार शृंगारे यांनी पत्रकार परिषदेत हे विधान केले. ते म्हणाले की, खासदार हा लोकसभेत प्रश्न मांडत असतो. त्यामुळे रेल्वे असो अथवा इतर केंद्र शासनाच्या योजना राबवणे असो, याचे श्रेय कोणाला जाते, हे जनतेला चांगले माहीत आहे.

MP Sudhakar Shrangare
संभाजी ब्रिगेडची रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त नवी घोषणा : आरक्षणाकडून अर्थकारणाकडे...

दिवंगत नेते, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी मोठे काम केले. लातूरचे नाव त्यांनी देशपातळीवर पोचवले आहे. त्यांचाच आदर्श घेऊन आपण विकासाचे काम करत असून लातूरचे नाव देशपातळीवर नेण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही शृंगारे यांनी म्हटले आहे.

MP Sudhakar Shrangare
भाजपने वाढविले गवळी, बारणे, किर्तीकरांसह शिंदे गटाच्या पाच खासदारांचे टेन्शन

केंद्र सरकारची लातूर येथील मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी खासगी कंपनी चालवणार आहे. त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. पण, नियंत्रण मात्र केंद्राचेच राहणार आहे. या फॅक्टरीचे लवकरच उद्‌घाटन करण्यात येणार आहे. या फॅक्टरीतून तयार होणारे कोच परदेशात देखील पाठवले जाणार आहेत. फॅक्टरीमध्ये ७० टक्के नोकऱ्या स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांनाच मिळाव्यात अशी विनंतीही केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे करण्यात आली असून ती त्यांनी मान्य केल्याची माहितीही शृंगारे यांनी या वेळी दिली.

MP Sudhakar Shrangare
शिंदे गटाच्या आमदारांचा जीव पुन्हा टांगणीला : मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त 'या' कारणांमुळे पुन्हा हुकणार?

लातूरमध्ये केंद्र सरकारच्या वतीने १८० कोटी रुपये खर्चून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. त्याचे खासगीकरण करू नये, अशी विनंती केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती. ती त्यांनी मान्य केली आहे. लवकरच त्यांच्याच हस्ते या हॉस्पिटलचे उद्‍घाटन होणार असल्याचे शृंगारे यांनी सांगितले. लातूर येथे आकाशवाणी केंद्र सुरू व्हावे यासाठी पाठपुरावा सुरू आहे. येत्या अधिवेशनातही या संदर्भात प्रश्न उपस्थित करणार आहे. लातूर- टेंभुर्णी रस्त्यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा झाली आहे. हा रस्ता चौपदरी व्हावा याकरिता पाठपुरावा सुरू आहे. चाकूर तालुक्यातील घरणी येथे एमआयडीसी उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे शृंगारे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in