भाजप उद्धव ठाकरेंना योग्य वेळी उत्तर देईल; बावनकुळेंचा इशारा

Chandrashekhar bawankule| अमित शहा यांना आस्मान दाखवण्याचे आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं आहे
Chandrashekhar bawankule
Chandrashekhar bawankule

मुंबई : “उद्धव ठाकरे सध्या घाबरलेल्या अवस्थेत आहेत, म्हणून ते बावचळल्यासारखी विधाने करत आहेत. सभा घेऊन मोठी भाषणे सुरू आहे. आमदार नाराज असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. पण गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत अशा विधानांची उद्धव ठाकरेंकडून अपेक्षा नव्हती. भाजप उद्धव ठाकरेंना योग्य वेळी उत्तर देईल.” अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे

गोरेगाव येथील नेस्को मैदानात शिवसेना गटप्रमुख आणि शाखाप्रमुखांचा मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपावर सडकून टीका केली. अमित शहा यांना आस्मान दाखवण्याचे आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही आगपाखड केली. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेनंतर बावनकुळे यांनी त्यांच्यावर टीकेवर हल्लाबोल केला आहे.

Chandrashekhar bawankule
इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेसने लावला निर्मला सीतारामन यांच्या ‘स्वागता’चा बॅनर!

“ग्रामपंचायत निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा गट पाच नंबरला गेल्याने ते निराश झाले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे २९४ सरपंच विजयी झाले. त्यामुळे ते वारंवार माझ्या नावाचा उल्लेख करत आहेत. पण उद्या जरी निवडणूक झाली तरी भाजपच महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष असेल,” असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात उद्धव ठाकरेंनी विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विचारांनी उद्धव ठाकरे सूडबुद्धीचे राजकारण केले. पण हे राजकारण फार काळ टिकणार नाही, ते स्वत:ला संपवत आहेत,” अशी घणाघाती टीकाही बानवकुळेंनी केली.

शिवसेनेत चारच जण शिल्लक राहतील. शिवसेनेला लवकरच पुन्हा खिंडार पडणार आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदार नाराज असल्याची अफवा पसरवली जात आहे. पण कोणताही आमदार नाराज नाही. जुन्या सरकारपेक्षा आताचे सरकार चांगले आहे. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in