उर्जा मंत्र्यांच्या ताफ्यावर वीज बीले भिरकावत भाजपकडून घोषणाबाजी

उर्जा मंत्री नितीन राऊत यांना सक्तीच्या वीजबील वसुली संदर्भात विरोधकांच्या मनात असलेल्या रागाला आज सामोरे जावे लागले.( Energy Minister Nitin Raut)
Nitin Raut

Nitin Raut

Sarkarnama

जालना ः राज्यात सुरू असलेल्या सक्तीच्या वीजबील वसुलीचा निषेध व्यक्त करत भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी आज थेट उर्जामंत्र्यांच्या गाडीवरच वीज बीले भिरकावली. यावेळी नितीन राऊत (Nitin Raut)व महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत युवामोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला. राज्यात शेतकऱ्यांकडून सक्तीने वीज बीलाची वसुली केली जात आहे. (Marathwada) या विरोधात विरोधी पक्ष असलेल्या भाजपने रान उठवले आहे.

मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या उर्जा मंत्री नितीन राऊत यांना सक्तीच्या वीजबील वसुली संदर्भात विरोधकांच्या मनात असलेल्या रागाला आज सामोरे जावे लागले. नितीन राऊत यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर बदनापूर शहरात भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी वीज बिले फेकली. ताफा आडवत ज्या गाडीत नितीन राऊत स्वतः बसले होते त्याच गाडीवर ही वीज बीले भिरकावण्यात आली.

भाजयुमोचे कार्यकर्ते यावेळी जोरदार घोषणाबाजी करत होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांची धरपकड करत त्यांना बाजूला केल्यावर मंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा पुढे मार्गस्थ झाला. कार्यकर्त्यांनी पहिले वीज बिल माफ करा नंतर मतदानाची बात करा,अशा घोषणा देत नितीन राऊत यांचा निषेध केला.

<div class="paragraphs"><p>Nitin Raut</p></div>
काही लोकांनी देवाच्या जमिनी खाल्ल्या; पण दहशतीचा अंत होतच असतो

राऊत आज नगर पंचायतीच्या प्रचारासाठी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. बदनापूर नगर पंचायतीच्या काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांची बदनापूर शहरात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. सभेच्या ठिकाणी जात असताना, जालना-औरंगाबाद महामार्गावर बाळाजी चौकात भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यावर वीज बिले भिरकावत निषेध नोंदवला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com