Bjp : नव्याने ठराव घेऊन केंद्राकडे पाठवा, आम्ही मोदींकडून `संभाजीनगर` करून घेऊ..

मुख्यमंत्री म्हणातात की संभाजीनगर आहेच, मग, माझा त्यांना प्रतिप्रश्‍न आहे की तुम्ही आणि माजी खासदार पेपरमध्ये तसेच शासकीय परिपत्रकांवर संभाजीनगर लिहता का? (Dr.Bhagwat Karad)
Dr.Bhagwat Karad-Chandrakant Khaire
Dr.Bhagwat Karad-Chandrakant KhaireSarkarnama

औरंगाबाद : शिवसेनेकडून औरंगाबादचे संभाजीनगर करण्याच्या मुद्यावरून केवळ राजकारण सुरू आहे. मुख्यमंत्री उद्वव ठाकरे आणि माजी खासदार पेपर वाचतात की नाही. शहराचे नाव संभाजीनगर करण्याचा ठरावर कोर्टाने रद्द केला होता. (Aurangabad) त्यामुळे आता नाव बदलायचे असेल तर नव्याने महापालिका, जिल्हा परिषदेत ठराव घेऊन तो राज्य सरकारकडे पाठवावा लागेल. राज्याने तो विधानसभेत मंजूर करून केंद्राकडे पाठवावा, तिथे मी, भाजपचे अन्य खासदार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पंतप्रधानांकडून संभाजीनगर करून घेऊ, असे म्हणत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड (Dr.Bhagwat Karad) यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

तुम्ही संभाजीनगर म्हणून उपयोग नाही, शासकीय परिपत्रक व वर्तमानपत्रात औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख करता का? असा प्रश्न देखील कराड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उद्देशून केला. (Shivsena) औरंगाबादेतील पाणी प्रश्नानावर येत्या २३ मे रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महापालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चा संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना कराड यांनी संभाजीनगरच्या मुद्यावरून शिवसेनेला सुनावले.

डाॅ. कराड म्हणाले, संभाजीनगर नामांतरचा मुद्दा सुप्रीम कोर्टांने रद्दबातल ठरवल्यानंतर महापालिका, जिल्हा परिषदेत ठराव घेऊन तो राज्य सरकारकडे द्यावा लागेल. विधान सभेत देखील तसा ठराव सरकारला नव्याने पारित करावा लागेल. मुख्यमंत्री म्हणातात की संभाजीनगर आहेच, मग, माझा त्यांना प्रतिप्रश्‍न आहे की तुम्ही आणि माजी खासदार पेपरमध्ये तसेच शासकीय परिपत्रकांवर संभाजीनगर लिहता का? केंद्र आणि राज्याच्या परिपत्रकावर औरंगाबादच लिहलेले असते ? मग लोकांच्या भावनेशी का खेळता ?

Dr.Bhagwat Karad-Chandrakant Khaire
Imtiaz Jalil : संभाजीनगर, औरंगजेब विषयावर बोलणार नाही ; माझ्यासाठी पाणी प्रश्न महत्वाचा..

राज्य सरकारने महापालिका प्रशासक आणि जिल्हा परिषदेच्या सीईओंकडून संभाजीनगराचा प्रस्ताव नव्याने पारित करून घ्यावा. तसे पत्र विधिमंडळ किंवा मंत्रीमंडळाच्या बैठकीत देऊन मंत्रीमंडळाने संभाजीगनर असे नामकरण करण्याचा ठराव मंजूर करून तो केंद्राकडे पाठवा. केंद्रात आम्ही केंद्रीय मंत्री सर्व खासदार, भाजपचे आमदार यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमांतून पंतप्रधानांना भेटून शहराचा नाव बदलून घेऊ. त्यासाठी ही प्रक्रीया पुन्हा करणे गरजेचे आहे, हे माजी खासदार खैरे यांना कळत नाही म्हणूनच ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असल्याचेही कराड म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in