भाजप म्हणते पंढरपूर नंतर देगलूर-बिलोलीत महाविकास आघाडीला दुसरा धक्का देणार

(Obc Reservation)ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्यास आघाडी सरकार जबाबदार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमधून या समाजाने आपली नाराजी स्पष्टपणे दाखवून दिली आहे.
भाजप म्हणते पंढरपूर नंतर देगलूर-बिलोलीत महाविकास आघाडीला दुसरा धक्का देणार
Bjp Mla Sanjay KuteSarkarnama

औरंगाबाद ः राज्यातील ओबीसी, मराठा आणि इतर बहुजन समाज हा राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात पेटून उठला आहे. आरक्षणाचा प्रश्न या सरकारने व्यवस्थित न हाताळल्यामुळेच मराठा समाजाचे शैक्षणिक आणि नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द झाले. त्यानंतर ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्यास देखील हेच आघाडी सरकार जबाबदार आहे. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमधून या समाजाने आपली नाराजी स्पष्टपणे दाखवून दिली आहे.

पंढरपूरच्या विधानभा पोटनिवडणुकीत तीन्ही पक्ष एकत्रित लढल्यानंतर देखील भाजपने तिथे विजय मिळवला. आता ओबीसी आणि मराठा समाजमध्ये आरक्षणाच्या प्रश्नावरून असलेली नाराजी देगलूर-बिलोलीच्या पोटनिवडनूकीत देखील दिसून येईल, आम्ही महाविकास आघाडीला दुसरा धक्का देणारच, असा दावा भाजपकडून केला जातोय.

औरंगाबादेत झालेल्या ओबीसी जागर अभियान मेळाव्यात भाजपचे आमदार संजय कुटे, ओबीसी सेलचे अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्यासह सर्वच नेत्यांनी आपल्या भाषणातून महाविकास आघाडीचा समाचार घेतांना देगलूर पोटनिवडणुकीत धक्का देण्याची भाषा केली होती.

आमदार संजय कुटे म्हणाले, राज्यात लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ बंद पुकारण्याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत घेतला जातो, हे जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले असेल. राज्यातील शेतकरी दोन वर्षांपासून मदतीसाठी झगडतो आहे, आत्मह्त्या करतोय पण या सरकारने त्याला एक रुपयाचीही मदत केली नाही. पण लखीमपूरच्या घटनेची महाविकास आघाडीच्या नेत्यांना चिंता लागली आहे.

खोटं बोल पण रेटून बोलंअसं धोरण या तीन पक्षांच्या सरकारने अवलंबले आहे. ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत हेच सुरू आहे. केंद्र सरकारमुळे हे आरक्षण गेले, देशभरातील ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले अस धादांत खोटं महाविकास आघाडीचे नेते सांगत आहेत. केंद्राचा याच्याशी काहीही संबंध नाही, शिवाय ओबीसींचे राजकीय आरक्षण केवळ महाराष्ट्रातले रद्द झाले आहे, देशातील इतर कुठल्याही राज्यात ते रद्द झाले नाही, ही वस्तुस्थिती आहे.

Bjp Mla Sanjay Kute
दिवाळीच्या तोंडावर मोदी सरकारचा गृहिणींना 'शॉक'

पण आपल पाप झाकण्यासाठी या सरकारचा हा सगळा खेळ सुरू आहे. मराठा, ओबीसी समाजाच्या हे आता लक्षात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडनुकीत या दोन्ही समाजांनी आपली नाराजी मतांच्या माध्यमातून दाखवून दिली आहे.आता देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघात देखील भाजप महाविकास आघाडी सरकारला दुसरा धक्का दिल्याशिवाय राहणार नाही. पंढरपूरच्या विजयाची आम्ही देगलूरमध्येही पुनरावृत्ती करू, असा दावा देखील कुटे यांनी आपल्या भाषणातून केला.

Related Stories

No stories found.