Bjp : राऊत, वडेट्टीवार घरगडी, पण अपक्ष आमदार कुणाचे घरगडी नाहीत...

आमदारांना कमी लेखन यांनी बंद करावे, नाहीतर राज्यसभेत याचे परिणाम त्यांना निश्चितच भोगावे लागतील. धमक्यांना कुठलाही आमदार भीक घालत नाही. (Beed News)
Mla Sanjay Kute-Mp Sanjay Raut- Vijay Wadettiwar
Mla Sanjay Kute-Mp Sanjay Raut- Vijay WadettiwarSarkarnama

बीड : महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून पाठवायच्या सहा जागांसाठी १० जून रोजी मतदान झाले. (Marathwada) त्यानंतर झालेल्या नाट्यमय घडामोडी आणि मतमोजणीनंतर महाविकास आघाडीला धक्का बसला. शिवसेनेचे संजय पवार यांचा आश्चर्याकारकरित्या पराभव झाला, तर भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक हे विजयी झाले. शिवसेनेला हो मोठा फटका असल्याने त्यांचे नेते सैरभैर झाल्याचे चित्र आहे.

अपक्ष, छोटे पक्ष आणि राष्ट्रवादी-काॅंग्रेसवर देखील शिवसेनेकडून आरोप केले जात आहेत. विशेषतः अपक्ष आमदरांवर शिवसेनेचा राग आहे. भाजपने देखील यावरून शिवसेनेला लक्ष्य केले आहे. भाजपचे आमदार संजय कुटे यांनी तर संजय राऊत (Sanjay raut) हे मातोश्रीचे व विजय वडेट्टीवार (Vijay vadettiwar) हे सोनिया गांधीचे घरगडी आहेत, अशी टीका केली आहे. ते घरगडी असतील पण अपक्ष आमदार कुणाचे घरगडी नाहीत, त्यांचा अपमान करू नका, अन्यथा परिणाम भोगावे लागतील असा इशारा देखील त्यांनी महाविकास आघाडीला दिला आहे.

बीड दौऱ्यावर असलेल्या संजय कुटे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना राज्यसभा निवडणुकीतील पराभवानंतर अपक्ष आमदारांना शिवसेनेकडून देण्यात येत असलेल्या धमक्यांचा समाचार घेतला. कुटे म्हणाले, अपक्ष आमदार हे कुणाचे घरगडी नाहीत. संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार हे मातोश्री आणि सोनिया गांधींचे घरगडी आहेत, हा त्याचा विषय आहे.

Mla Sanjay Kute-Mp Sanjay Raut- Vijay Wadettiwar
Bjp : एक-दोन मतं इकडं तिकडं झाली असती, तर संजय राऊतांची दांडी गूल झाली असती..

आमदारांना कमी लेखन यांनी बंद करावे, नाहीतर राज्यसभेत याचे परिणाम त्यांना निश्चितच भोगावे लागतील. धमक्यांना कुठलाही आमदार भीक घालत नाही, २० तारखेला होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत हे सत्ताधारी महाविकास आघाडीला पुन्हा एकदा दिसेल, असा सूचक इशारा देखील कुटे यांनी यावेळी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com