Pankaja Munde News : पंकजा मुंडेंनी फडणवीसांना सलग दुसऱ्यांदा टाळले ; काय आहे कारण..

Pankaja Munde News : पंकजा मुंडे व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच मंचावर येणार होते.
Bjp Leader Pankaja Munde-Devendra Fadanvis News, Aurangabad
Bjp Leader Pankaja Munde-Devendra Fadanvis News, AurangabadSarkarnama

Pankaja Munde News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या बीड जिल्ह्यातील जाहीर कार्यक्रमास सलग दुसऱ्यांदा पंकजा मुंडे (Pankaja Munde), प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनी पाठ फिरवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Pankaja Munde latest News)

मुंडे भगिनींच्या अनुपस्थितीमुळे पुन्हा एकदा मुंडे या फडणवीसांवर नाराज आहेत का ? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. बीडमधील गहिनीनाथ गडावरील एका कार्यक्रमात आज (रविवारी) भाजप नेत्या पंकजा मुंडे व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच मंचावर येणार होते.

Bjp Leader Pankaja Munde-Devendra Fadanvis News, Aurangabad
Ajit Pawar News : जलसंपदा सचिव सुरेश सोडळ यांचे ऐकले असते तर आरोप झालेच नसते ; अजितदादांचे स्पष्टीकरण

या कार्यक्रमाबाबत चांगलीच उत्सुकता होती. मात्र, आता पंकजा मुंडे यांनी येथील दौराच रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आजचा गहिनीनाथ गडावरील दौरा रद्द केला आहे.

या कार्यक्रमाला खासदार प्रीतम मुंडे आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे वगळता इतर सर्व आमदार आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते .

आजारी असल्याने पंकजा मुंडे यांनी दौरा रद्द केल्याचे समजते. तर प्रितम मुंडे या जिल्ह्यात नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. सलग दुसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांच्या बीड जिल्ह्यातील जाहीर कार्यक्रमास पंकजा मुंडे जाण्याचे टाळले आहे. गेल्या काही दिवसातील फडणवीस यांचा बीडमध्ये हा दुसरा कार्यक्रम आहे.

Bjp Leader Pankaja Munde-Devendra Fadanvis News, Aurangabad
BrijBhushan Singh News : भाजप खासदाराने मानले राज ठाकरेंचे आभार ; म्हणाले, '..तो विषय आता..'

३१ डिसेंबर रोजी शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांनी सुरू केलेल्या व्यसनमुक्ती कार्यक्रमाला फडणवीसउपस्थित होते. मात्र,पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली होती. त्यानंतर आजच्या कार्यक्रमासही त्या गैरहजर होत्या.

पंकजा मुंडे दरवर्षी सातत्याने गहिनीनाथ गडावर येत असतात. पण पहिल्यांदाच त्यांनी हा दौरा रद्द केल्याने अनेक राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज असल्याने ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे आणि सुनील शिंदे यांनी त्यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे.

Bjp Leader Pankaja Munde-Devendra Fadanvis News, Aurangabad
Ganga Vilas River Cruise News : मोदींच्या गंगा विलास रिव्हर क्रूझला 'या' राज्यांची आडकाठी

जुन्या चर्चा पुन्हा रंगल्या

काही महिन्यापूवी विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा यांना भाजपने विधान परिषदेवर आमदारकीची संधी नाकारली गेली. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे स्थान दिलं जाईल, अशी अपेक्षा होती. तीही फोल ठरली. तेव्हा मुंडे भगिनी या भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या, आता त्याच जुन्या चर्चा पुन्हा रंगल्या आहेत.

भाजपला इशारा तर दिला नाही ना?

अचानक दौरा का रद्द केला?, याबाबत अद्याप पंकजा मुंडे यांनी खुलासा केलेला नाही. मात्र, काही दिवसांपूर्वीच 'स्वाभिमानानं केलेला एक्झिट कधीही बरा', असे म्हणत त्यांनी खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे फडणवीसांचा समावेश असलेल्या कार्यक्रमाचा दौरा रद्द करत पंकजा मुंडे यांनी भाजपला इशारा तर दिला नाही ना?, असा प्रश्न सध्या विचारण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in