Bjp : दिशाभूल करणारे फोटो टाकण्यापेक्षा आमदारांनी शिवसेनेच्या दुरावस्थेकडे लक्ष द्यावे..

देंवेद्र फडणवीस यांनी बॅरिकेटस बाजूला हटवून कार्यालयात घुसतानाचा प्रयत्न केला होता. हे पळून जात असतांनाचे छायाचित्र असल्याचे भासवण्याचा खोडसाळपणा आमदारांना शोभण्यासारखा नाही. (Bjp)
Bjp Leadar Sanjay Kenekar
Bjp Leadar Sanjay KenekarSarkarnama

औरंगाबाद : आमदार अंबादास दानवे यांनी विरोधीपक्ष नेते देंवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो सोशल मिडीयावर शेअर केला आहे. (Bjp) यावरून भाजप विरुध्द शिवसेना असे सोशल मिडीया वॉर सुरु झाले आहे. (Shivsena) आमदार अंबादास दानवे यांनी शेअर केलेला फोटो हा दिशाभूल करणारा आहे. अशी खोटी माहिती टाकण्यापेक्षा त्यांनी शिवसेनेच्या दुरावस्थेकडे जरा लक्ष द्यावे, असा टोला भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर (Sanjay Kenekar) यांनी लगावला आहे.

१ मे रोजी मुंबईतील सोमय्या मैदानावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुस्टर सभा झाली. या सभेत फडणवीस यांनी शिवसेनेच्या बाबरी मशीद आम्ही पाडली, या दाव्याची पोलखोल करत बाबरी प्रकरणात ज्या नेत्यांवर गुन्हे दाखल झाले त्यांची यादीच सभेत वाचून दाखवली होती. (Aurangabad) त्यानंतर शिवसेनेचे आमदार जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी फडणवीस यांचा ते युवामोर्चात काम करत असतांनाचा एक फोटो आपल्या फेसबुक पेजवरून शेअर केला होता.

Bjp Leadar Sanjay Kenekar
Jalna : वाघ्या-मुरळीच्या गोंधळात रावसाहेब दानवेंनी वाजवले तुणतुणे..

`लाठीचार्ज होताच पळ काढणारे, म्हणे आम्ही बाबरी पाडायला गेलो होतो`, असा मजकुर देखील त्यांनी टाकला होता. या फोटोची आणि पोस्टची सोशल मिडियावर चांगलीच चर्चा झाली. त्यावर आता भाजपकडून प्रतिक्रिया आली असून शहराध्यक्ष केणेकर यांनी दानवे यांना सुनावले आहे. एक व्हिडिओ व्हायरल करत केणेकर यांनी अंबादास दानवे यांना `चुकीचे व दिशाभूल करणारे फोटो व्हायरल करण्यापेक्षा शिवसेनेची जिल्ह्यात जी दुरावस्था झाली आहे, त्याकडे जरा लक्ष द्या`, अशा शब्दांत सुनावले.

या संदर्भात केणेकर म्हणाले, शिवसेनेची केवीलवाणी परिस्थिती झाली याचे दर्शन घडवणारा हा प्रकार आहे. या फोटोवर विपार्यास होणारी व दिशाभूल करणारी टिप्पणी टाकण्यात आली असून शिवसेनेला जिंवत ठेवण्यासाठीचा हा प्रकार आहे. हे छायाचित्र जुने महवितरण कार्यालयसमोरील आंदोलनाचे आहे. जेव्हा महावितरण कार्यालयावर देंवेद्र फडणवीस यांनी बॅरिकेटस बाजूला हटवून कार्यालयात घुसतानाचा प्रयत्न केला होता.

हे पळून जात असतांनाचे छायाचित्र असल्याचे भासवण्याचा हा खोडसाळपणा आमदारांना शोभण्यासारखा नाही. एवढंच सांगतो, आज शिवसेनेची काय आवस्था झाली आहे याकडे आपण लक्ष देण्याची गरज आहे. याकडे लक्ष दिले तर असे प्रकार करण्याचीवेळ आपल्यावर येणार नाही, असेही केणेकर म्हणाले. दरम्यान, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र साबळे यांनी देखील आमदार दानवे यांच्या पोस्टला जशास तसे उत्तर देऊ असे म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com