Latur News : संभाजी पाटील निलंगेकरांनी देशमुखांना पुन्हा डिवचलं; म्हणाले, ''ज्यांना स्वत: च्या मतदारसंघात मुताऱ्या...''

Sambhaji Patil Nilangekar Vs Amit Deshmukh : निलंगा तालुक्यावर कायमच देशमुखांनी अन्याय केला आहे.
Sambhaji Patil Nilangekar, Amit Deshmukh
Sambhaji Patil Nilangekar, Amit Deshmukhsarkarnama

Latur Political News : भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि माजी मंत्री व काँग्रेस नेते अमित देशमुख यांच्यात कायमच कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळत असतो. आता पुन्हा एकदा संभाजी पाटलांनी देशमुखांना डिवचलं आहे. ज्यांना स्वत: च्या मतदारसंघात मुताऱ्या बांधता आल्या नाहीत, त्या अमित देशमुखांनी (Amit Deshmukh) आतापर्यंत किती निधी आणला असा हल्लाबोल निलंगेकरांनी केला आहे. आता निलंगेकरांच्या टीकेनंतर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

आमदार संभाजी पाटील निलंगेकर(Sambhaji Patil Nilangekar) यांनी निलंगा येथील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अमित देशमुखांवर सडकून टीका केली. निलंगेकर म्हणाले, भाजपाच्या 2014 ते 2019 या सत्ताकाळात जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात भरघोस विकास निधी आला. अनेक कामं झाली, मात्र सत्ता बदल झाल्यावर अडीच वर्षात विकास निधी अत्यल्प आला. त्यातही निलंगा तालुक्यावर कायमच देशमुखांनी अन्याय केला आहे. देशमुखांकडून कायमच निलंगा आणि निलंगेकरांचा दुस्वास करण्यात आला आहे.

Sambhaji Patil Nilangekar, Amit Deshmukh
ZP : विरोधकांच्या सभात्यागाने मुद्दा निसटला, अन् माजी सभापतींचा जीव भांड्यात पडला !

मागील इतिहास जर काढला तर लातूरमध्ये अमित देशमुखांनी अनेक वर्ष सत्ता उपभोगली, त्या काळात आलेला निधी आणि मी पालकमंत्री असताना आलेला निधी किती? हे एकदा तपासा. देशमुखांना लातूर येथे साध्या मुताऱ्या बांधता आल्या नाहीत. आमच्या सत्तेच्या काळात आम्ही त्या बांधल्या आहेत अशी बोचरी टीका निलंगेकर यांनी यावेळी केली.

मी कोणाच्या खोलात नाही जात. मागचा सगळा इतिहास काढा आणि 2014 मधला भाजपच्या काळातील सरकारचा इतिहास काढा. माझं जाहीर आव्हान आहे तिथल्या आमदाराला. त्यांनी माझ्यासोबत बसावं आणि 2014 आणि 2019 सालचा इतिहास काढावा आणि सांगावं निधी कधी, कोणत्या साली जास्त आला आहे. त्यांच्या संपूर्ण काँग्रेसच्या कालावधीत जेवढा निधी आला नाही, तेव्हा आम्ही आमच्या सरकारच्या काळात आणला असल्याचंही आमदार संभाजी पाटील निलंगेकर यावेळी म्हणाले.

Sambhaji Patil Nilangekar, Amit Deshmukh
Mp Sanjay Jadhav News : सात जन्मही मी या पक्षाचे उपकार फेडू शकणार नाही..

...अन् अमित देशमुखांची झाली कोंडी!

औसा मतदारसंघातून 2019 रोजीच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार बसवराज पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, आता खासदार सुधाकर शृंगारेंच्या एका विनंतीमुळे अमित देशमुख यांची चांगलीच कोंडी झाली आहे.

औसाचे आमदार अभिमन्यू पवार निवडून यावे म्हणून अमित देशमुख यांनी जसे प्रयत्न केले तसेच आर्शीवाद पुढील निवडणुकीत निवडून येण्यासाठी असू द्यावेत अशी जाहीर विनंती खासदार सुधाकर तुकाराम शृंगारे यांनी केली. त्यांच्या या विनंतीमुळे काँग्रेसचे नेते अमित देशमुख भाजपचे आमदार निवडून येण्यासाठी मदत करत होते का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in