विराट सभेचा फॉर्म्यूला! नितेश राणेंनी 'तो' फोटो ट्विट करताच खैरे संतापले

औरंगाबादमध्ये बुधवारी शिवसेनेची स्वाभिमान सभा पार पडली.
Shiv Sena Leader Chandrakant Khaire Latest Marathi News
Shiv Sena Leader Chandrakant Khaire Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : औरंगाबाद येथे बुधवारी शिवसेनेची स्वाभिमान सभा पार पडली. या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसह मनसेवरही जोरदार प्रहार केले. सभेनंतर भाजपकडूनही त्याला प्रत्युत्तर देण्यात आलं. तर आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचा एक फोटो ट्विट केल्यानं वाद निर्माण झाला आहे. (Nitesh Rane Latest Marathi News)

राणे यांनी विराट सभेचा फॉर्म्यूला असं लिहित खैरेंचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये खैरे यांच्याभोवती लोकं जमलेली दिसतात. तर खैरे यांच्या हाता पैसे दिसत असून ते लोकांना देताना दिसत आहेत. या फोटोवरून नितेश राणेंनी खैरेंसह शिवसेनेवरही निशाणा साधल्याची चर्चा आहे. (Shiv Sena Leader Chandrakant Khaire News)

Shiv Sena Leader Chandrakant Khaire Latest Marathi News
शिवसेनेचे आमदार मुक्कामी असलेल्या हॉटेलात शेलार गेले अन् केसरकरांशी बोललेही!

राणे यांच्या फोटोवरून वाद निर्माण झाला असून खैरे यांनी त्यांच्या गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. नितेश राणे माझ्यापेक्षा खूप लहान आहेत. जुने फोटो कोणत्यावेळी काढायचे, हे त्यांना समजत नाही. माझे कालचे कपडे कोणते होते, त्यावेळचे कपडे कोणते होते, त्याचे पुरावे आहेत, असं खैरे म्हणाले आहेत.

भाजपचे काही फालतू लोक जे काय करत आहेत, त्याविरोधात आमचे कार्यकर्ते पोलिसांकडे जाऊन गुन्हा दाखल करतील. धार्मिक कार्यक्रमातील तो फोटो असेल. हा मुद्दाम बतनाम करण्याचा प्रयत्न आहे. नितेश राणेंनी 16 पेट्रोल पंप कुठून आणले, काय-काय केलं हे सगळं काढतो. मी शिवसेनेचा जुना कार्यकर्ता आहे, असा इशाराही खैरे यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com