शिवसेनेच्या क्षीरसागरांना भाजप आमदार धस, पवारांकडून दिवाळी शुभेच्छा

(Bjp Mla Best Wishes to Shivsena Leader) बीड नगर पालिका हद्दीतील काही भाग गेवराई विधानसभा क्षेत्रात आहे. त्यामुळे अलिकडे पवार - क्षीरसागर भेटी एकमेका सहाय्य करु, अशाही ठरू शकतात.
Bjp Mla Dhas-Pawar-Jaydatta Kshirsagar
Bjp Mla Dhas-Pawar-Jaydatta KshirsagarSarkarnama

बीड : शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वतीने आयोजित दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमाला भाजप आमदार सुरेश धस व लक्ष्मण पवार यांनीही हजेरी लावली. क्षीरसागरांना या दोघांनी शुभेच्छाही दिल्या. क्षीरसागरांतर्फे रविवारी त्यांच्या केएसके महाविद्यालयात स्नेहमिलन व भोजनाचा कार्यक्रम झाला.

बीड मतदार संघासह जिल्ह्याच्या विविध भागांतून समर्थकांनी हजेरी लाऊन जयदत्त क्षीरसागर व डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांना शुभेच्छा दिल्या. दोन्ही बंधू शुभेच्छा स्विकारुन जेवणाचा आग्रह करत होते. या कार्यक्रमाला भाजपचे आमदार सुरेश धस व आमदार लक्ष्मण पवार यांनीही हजेरी लावली.

मागच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सुरेश धस भाजपकडून विजयी झाले आणि त्यावेळी राष्ट्रवादीत असलेल्या डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी विजयाचा जल्लोष केला होता. सहाजिकच त्यांनी कोणाला मदत केली असेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आताही बीड नगर पालिकेची निवडणुक तोंडावर आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील मदतीची ते शुभेच्छांसह परतफेड करणार का हे पहावे लागेल.

तर, बीड - गेवराई या दोन विधानसभा मतदार संघांची हद्द एक आहे. बीड नगर पालिका हद्दीतील काही भाग गेवराई विधानसभा क्षेत्रात आहे. त्यामुळे अलिकडे पवार - क्षीरसागर भेटी एकमेका सहाय्य करु, अशाही ठरू शकतात. पुर्वी गेवराई मतदार संघात क्षीरसागरांच्या बदामराव पंडित यांना शुभेच्छा असत.

Bjp Mla Dhas-Pawar-Jaydatta Kshirsagar
सपना चौधरीच्या ठुमक्यांतून वेळ मिळाला तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या

आता परवाच भाजप आमदार पवारांच्या निधीतल्या सभागृहाचे क्षीरसागरांच्या हस्ते भूमिपुजन आणि आता पवारांकडून क्षीरसागरांना शुभेच्छा. त्यामुळे भविष्यात गेवराईत क्षीरसागरांच्या शुभेच्छा पवारांच्या मागे असणार का, हेही पहावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com