बबनराव लोणीकरांना उपरती... अखेर वीजबिल भरले!

BJP MLA Babanrao Lonikar : बबनराव लोणीकर यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपचा तापस सुरु झाला आहे.
Mla Babanrao Lonikar
Mla Babanrao LonikarSarkarnama

मुंबई : भाजप आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी वीजबिल न भरल्यामुळे महावितरणने कारवाई केली होती. त्यानंतर संतापलेल्या लोणीकर यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्याला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली होती. शासकीय अधिकाऱ्याला धमकी देणे आणि आक्षेपार्ह भाषा आम्ही खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी दिला होती. त्यानंतर आता लोणीकर यांनी थकीत वीजबिल भरले आहे.

लोणीकर यांच्या १. ग्राहक क्रमांक- ४९००१४८८९१०५ राहूल बबनराव यादव हाऊस नं.५२, गट नंबर १४६, आलोक नगर, औरंगाबाद पीन कोड- ४३०००१. मार्च २२ अखेर एकूण थकबाकी-३ लाख २१ हजार ४७० रुपये होती. हे बील लोणीकर यांनी भरल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

लोणीकर यांनी महावितरणच्या (MSEB) अधिकाऱ्यांना दिलेली धमकी व वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेबद्दल राऊत यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच लोणीकर यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आता व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपवर तापस सुरु आहे. त्यामुळे लोणीकर अडचणीत येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर त्यांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

Mla Babanrao Lonikar
महावितरणच्या अधिकाऱ्याला धमकी देणे लोणीकरांना भोवणार; उर्जामंत्र्यांचे कारवाईचे आदेश

लोणीकर यांनी महावितरणच्या अधिका-यांना निलंबित करण्याची धमकी देणे हा शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा व शासकीय अधिका-यांवर चुकीच्या कामांसाठी दबाव टाकण्याचा प्रकार आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांना सातत्याने प्राप्तीकर आणि ईडी यांच्या धाडी टाकण्याची धमकी भाजप नेते देत असतात. आता ही धमकी अधिका-यांनाही देण्यापर्यंतची पातळी या नेत्यांनी गाठली. हे अतिशय धक्कादायक व वेदनादायी असल्याचे राऊत म्हणाले होते. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला हे शोभणारे नाही. त्याबद्दल लोणीकर यांनी महाराष्ट्राची व महावितरणच्या अधिका-यांची माफी मागायला हवी. त्या बरोबर दलित वस्त्यांबाबत त्यांनी केलेले वक्तव्यही आक्षेपार्ह आहे. यावरून त्यांची दलित समाजाबद्दलची मानसिकता दिसून येते, असेही राऊत म्हणाले होते.

व्हायरल ऑडिवो क्लिपवर लोणीकर म्हणाले?

वीजबिल वसुलीला माझा विरोध असल्यामुळे माझ्याविरोधात रचलेले हे षडयंत्र असल्याचा दावा लोणीकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे. व्हायरल झालेली कॅसेट खोटी आहे, मी कुठल्याच वीज कंपन्याच्या अधिकाऱ्याला फोन केला नाही, माझ्या बंगल्याचे मीटर काढून नेले नाही, असा खुलासाही लोणीकर यांनी केला आहे. दिनदुबळ्या, शेतकरी, दलित, कष्टकरी, मजुरांची वीज हे सरकार सातत्याने कापते आहे. या विरोधात मी व भाजपचे सगळे आमदार सातत्याने सभागृहात आवाज उठवत असतो. पण महाविकास आघाडी सरकारला गरिबांचे दुःख समजत नाही.

Mla Babanrao Lonikar
घरकुल योजनेचा डीपीआर मंजुर झाला; श्रेय एमआयएमचे की भाजपचे? रस्सीखेच सुरू

मराठवाड्यातील अनेक विकासकामांच्या योजना या सरकारने बंद करून टाकल्या आहेत, त्यासंदर्भात देखील मी सभागृहात वेळोवेळी आवाज उठवला. पण राजकीय सुडबुद्धीतून कुणी तरी माझ्या विरोधात षडयंत्र रचत ही खोटी कॅसेट व्हायरल केली आहे. औरंगाबादेत माझे दोन बंगले आहेत आणि त्याचे मीटर काढून घेतल्याचा उल्लेख या क्लीपमध्ये आहे. मुळात औरंगाबादेत माझा एकच बंगला आहे आणि त्याचे मीटर कुणीही काढून नेलेले नाही. त्यामुळे मी वीज अधिकाऱ्याला फोन करण्याचा आणि धमकावण्याचा प्रश्नच येत नाही. व्हायरल झालेली कॅसेट खोटी आणि मला बदनाम करण्यासाठी व्हायरल करण्यात आल्याचेही लोणीकर म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com