धनंजय मुंडे तुम्ही तर 32 नंबरचे मंत्री...

पंकजा मुंडेंनी (Pankaja Munde) बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Pankaja Munde-Dhnanjay Munde

Pankaja Munde-Dhnanjay Munde

Sarkarnama

बीड : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या (Local Body Election) पार्श्वभूमीवर राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फैरी राजकीय मंडळीकडून एकमेकांवर झाडल्या जात आहेत. त्यात बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा भावा-बहिणीचा संघर्ष या निवडणुकीच्या निमित्ताने बघायला मिळत आहे. प्रचारादरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) निधी आणण्याची घोषणा केली. यावर भाजपनेत्या पंकजा मुंडेंनी (Pankaja Munde) त्यांच्या घोषणेचा चांगलाच समाचार घेतला आणि तुम्ही तर 32 नंबरचे मंत्री आहात, असा खोचक टोला त्यांना लगावला आहे.

<div class="paragraphs"><p>Pankaja Munde-Dhnanjay Munde</p></div>
पन्नास कोटी द्या, घरदार सगंळ तुमच्या नावावर करतो; धस यांचे विरोधकांनाच आव्हान

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक प्रचारादरम्यान पाटोदा येथे प्रचार सभेत धनंजय मुंडे यांनी शंभर कोटींच्या निधी आणण्याची घोषणा केली. तर, पाच नगरपंचायतीला पाचशे कोटी निधी आणणार, असे अश्वासन त्यांनी दिले. त्याच्या विधानाचा पंकजा यांनी चांगलाच समाचार घेतला. त्या बीडमधील वडवणी नगरपंचायत प्रचार सभेत बोलतांना म्हणाल्या, सगळे माझ्याच गल्‍ल्यात आले पाहिजे. हे आमदार आणि पालकमंत्री यांचे सुरू आहे. याला जेलमध्ये घालू त्याला जेलमध्ये घालू सगळ्यांना जेलमध्ये घालणारा पालकमंत्री पाहिजे का? असा सवाल करत, त्यांनी कुणाचे घर बरबाद करायचे आहे, असे राजकारण मुंडे साहेबानी शिकवले नाही, असा टोला त्यांनी लगावला.

आता तुम्ही निवडणुकाच्या तोंडावर निधी आणायच्या घोषणा करत आहात, दोन वर्ष झाले आपण सत्तेत आहात आतापर्यंत आपण काय टाळ कुटत होतात काय? असा जळजळीत सवाल त्यांनी धनंजय मुंडेंना विचारला आहे. यावेळी माजी मंत्री महादेव जानकर, माजी आमदार आर. टी. देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

<div class="paragraphs"><p>Pankaja Munde-Dhnanjay Munde</p></div>
`फडणवीसांकडेच मुख्यमंत्रीपद देण्याचे ठरले होते; शिवसेनेनेच सत्तेसाठी वचन मोडले`

धनंजय मुंडे कोणत्या तोंडाने लोकासमोर येतात

याच सभेत बोलतांनी पंकजा म्हणाल्या, धनंजय मुंडे यांचे ओबीसी आरक्षणासंदर्भात कोणातेच स्टेटमेंट नाही. कोणत्या तोंडाने ते लोकासमोर येतात. आरक्षण द्या अगर नका देऊ मात्र, आमची दुकान चालली पाहिजे. असे महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि मंत्र्यांना वाटते. त्यांचे भविष्य फार चांगले नाही. अमित भाई शहा यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांसह नेत्यांमध्ये आनंद आहे बऱ्याच दिवसानंतर ते महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आले आहेत. त्यामुळे बरे वाटायला लागले. आता या सरकारचा त्यांचा कबाडा होणार आहे. राज्यात सत्ता परिवर्तन होणार असून महाविकास आघाडी सरकार जास्त काळ टिकणार नसल्याचेही पंकजा यावेळी म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com