Pankaja Munde On Vaidyanath Factory: वैद्यनाथ कारखान्याच्या नोटिशीवर पंकजा मुंडे बोलल्याच...

Vaidyanath Sugar Factory : 'मी सोडून बाकी सर्वांच्या कारखान्याला मदत : पण...'; 'वैद्यनाथ' च्या कारवाईवरून पंकजा मुंडेंनी केंद्रावर व्यक्त केली नाराजी
Pankaja Munde
Pankaja MundeSarkarnama

Mumbai News: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याकडे तब्बल १९ कोटी रुपयांची जीएसटी रक्कम थकली आहे. या थकलेल्या कराची वसुली करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील जीएसटी आयुक्तांनी कराची वसुली आणि मालमत्ता जप्तीसंदर्भात कारखान्याला नोटीस जारी केल्याचे वृत्त रविवारी माध्यमात झळकले. त्यानंतर आता यावर खुद्द पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.

"वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यासंदर्भात जे आकडे सांगितले जात आहेत, ते आकडे व्याजाबाबत असून, यामध्ये कुठेही काही चुकीचे झालेले नाही. कारखाना तोट्यात असतानादेखील शेतकऱ्यांचे पैसे देण्यात आले. ऊस आणि आर्थिक परिस्थितीमुळे कारखाने चालले नाहीत. त्यामुळे ८ ते ९ कारखान्यांनी दिल्लीत मदतही मागितली होती. त्यामध्ये माझेही (वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे) नाव होते. मात्र, मी सोडून बाकी सर्वांना आर्थिक मदत मिळाली. जर मदत मिळाली असती तर असे प्रकार घडले नसते", अशी खंत माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.

Pankaja Munde
Vaidyanath Sugar Factory : पवारांकडून मुंडेंच्या कारखान्याला मदत; मग अमित शाहांकडून हात आखडता का?

भाजप नेते तुमची कोंडी करताहेत का? आणि तुम्ही किती दिवस ही कोंडी सहन करणार आहात ? असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी पंकजा मुंडेंना विचारला असता, यावर उत्तर देताना "मी सहनशील कन्या आहे. त्यामुळे किती दिवस सहन करायचे हे ज्योतिषाला विचारून सांगते", असं उत्तर त्यांनी दिले.

दरम्यान, केंद्रीय सहकार विभागाने (GST) सहकारी साखर कारखान्यांना काही दिवसांपूर्वी कोट्यवधी रुपयांचा आयकर माफ करत मदत केली. पण याचवेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्याला मात्र मदत मिळाली नाही. त्यामुळे परळीच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला मदत का मिळत नाही, असा सवाल आता राजकीय वर्तुळातून उपस्थित करण्यात येत आहे.

Edited By- Ganesh Thombare

Pankaja Munde
Vaidyanath Sugar Factory : पंकजा मुंडेना जीएसटी विभागाचा मोठा दणका, वैद्यनाथ कारखान्याची १९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com