बहीण-भावांची पुन्हा जुगलबंदी : पकंजांनी दिला कोरा चेक; धनुभाऊ म्हणतात बाऊन्स होऊ देणार नाही

Pankaja Munde, Dhananjay Munde News : परळीमध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे (NCP) नेते धनंजय मुंडे यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली.
Pankaja Munde, Dhananjay Munde News
Pankaja Munde, Dhananjay Munde NewsSarkarnama

Pankaja Munde, Dhananjay Munde News : परळीमध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे (NCP) नेते धनंजय मुंडे यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली. परळीमध्ये एका कार्यक्रमात दोघेही भाऊ-बहिण एकत्र आले होते. या वेळी बहिणीने दिलेला चेक तो बाउन्स होऊ देणार नाही, असा मिश्किल टोला धनंजय यांनी लगावला. या जुगलबंदीमुळे सभागृहात एकच हश्शा पिकला.

अहमदाबाद (गुजरात) येथे पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत "स्केट बोर्ड" या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावून ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेली परळीची कन्या श्रध्दा रविंद्र गायकवाड हिच्या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर आले होते. या वेळी या दोघांमध्ये चांगलाच कलगीतुरा पाहायला मिळाला.

Pankaja Munde, Dhananjay Munde News
एकनाथ खडसेंविरोधात गिरीश महाजनांनी सर्व विरोधक एकत्र केले

परळीची सुवर्ण कन्या श्रद्धा गायकवाड हिच्या नागरी सत्कार सोहळ्यात या दोन्ही नेत्यांनी हजेरी लावली. या वेळी पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, 'श्रद्धा तुला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान कडून मदतीसाठी ब्लॅक चेक देते. जेवढी रक्कम तिला हवी आहे, तेवढी त्यांनी टाकावी. फक्त चेक बाउन्स झाला नाही पाहिजे, एवढी रक्कम भरा' असे सांगत त्यांनी श्रद्धाला मदत केली.

त्यानंतर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे भाषणाला उभे राहिले. यावेळी ते म्हणाले, 'पंकजाताईंनी आता श्रद्धाला चेक दिला. धनंजय मुंडे एवढे म्हणताच पंकजा म्हणाल्या 'त्यात पैसे टाका' त्यामुळे सभागृहात एकच हश्शा पिकली. या धनंजय यांनीही मिश्किल उत्तर दिले. ते म्हणाले, 'जरी त्या अकाउंट मध्ये पैसे कमी पडले, तर मी टाकेल अजून ही टाकत आहे. बहिणीने चेक दिला असला तरी भाऊ तो बाऊन्स होऊ देणार नाही, काळजी करू नको' असे धनंजय यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये चांगलीच खसखस पिकली.

Pankaja Munde, Dhananjay Munde News
एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना धक्क्यांवर धक्के, नागपुरात जुना शिलेदार फोडला...

पंकजा मुंडे म्हणाल्या, एका लेकीने दुसर्‍या लेकीचा केलेला हा सत्कार आहे. तिने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत स्वाभिमान आणि सन्मानाने यश प्राप्त केले. याच मी मनापासून कौतुक करते. तिचा मला खूप अभिमान आहे. परळीत अशा अनेक श्रध्दा घडाव्यात यासाठी एक उर्मी या कार्यक्रमातून मिळाली. श्रद्धाची यशोगाथा देशाच्या पंतप्रधानापर्यंत, क्रीडा मंत्र्यांपर्यत पोचवेन, असे आश्वासनही त्यांनी दिले. खरे तर तिला आम्ही काही मदत करणे हे खूजेपणाचे ठरेल. तथापि गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने मी तिला कोरा चेक देईल. श्रद्धा..तु अशीच लढत रहा, ऑलिंपिकमध्येही तु सुवर्णपदक मिळवावेस अशा शुभेच्छा दिल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com