Bjp : कराड म्हणाले बंडाशी काडीचा संबंध नाही, पण भाजप सत्ता स्थापन करेल..

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री, आमदार यांचा एकमेकांवरच विश्वास राहिलेला नाही. आमदारांची कामे होत नाही, निधी मिळत नाही, अशी नाराजी अेकांनी जाहीरपणे व्यक्त केली आहे. ( Dr. Bhagwat Karad)
Central State Minister Dr.Bhagwat Karad
Central State Minister Dr.Bhagwat KaradSarkarnama

औरंगाबाद : शिवसेनेचे नगरविकास मंत्री एकनाथ खडसे यांच्या बंडामागे भाजपचा हात आहे, असा आरोप होत आहे. भाजपने मात्र याचा वारंवार इन्कार केला आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड (Dr.Bhagwat Karad) यांनी देखील शिंदे यांच्या बंडाशी भाजपचा काडीचाही संबंध नाही, पण आम्ही लवकरच सत्ता स्थापन करु असे दिसते, असे म्हटले आहे. (Bjp) भाजपची सत्ता आल्यानंतरच आमदारांची नाराजी दूर होईल आणि जनतेला न्याय मिळेल, असा दावाही त्यांनी केला.

औरंगाबादेत (Aurangabad) प्रसार माध्यमांशी बोलतांना कराड यांनी वरील विधान केले आहे. शिंदे यांच्या बंडाला आज पाच दिवस होत आले आहेत, परंतु राज्यातील राजकीय नाट्यावर अजूनही पडदा पडलेला नाही. ५० पेक्षा जास्त शिवसेना व अपक्ष आमदार आसाममधील गुवाहाटीच्या हाॅटेलात मुक्काम ठोकून आहेत. महाविकास आघाडीकडून विशेषतः शिवसेना हे बंड मोडून काढण्यासाठी आक्रमक झाली आहे.

बंडखोरांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक होऊन रस्त्यावर उतरले आहेत, तर दुसरीकडे शिंदे व त्यांची सेना महाविकास आघाडी सरकारशी दोन हात करायला सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. या सगळ्या राजकीय नाट्यावर भाजप बारकाईने लक्ष ठेवून आहे. पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू असल्या तरी उघडपणे भाजप अजूनही या बंडाशी आमचा संबंध नसल्याचे सांगत आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री कराड यांनी देखील हीच भूमिका मांडली.

Central State Minister Dr.Bhagwat Karad
Tanaji Sawant : औकातीत राहा, राजकीय तिढा सुटला की जशास तसे उत्तर देऊ..

कराड म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री, आमदार यांचा एकमेकांवरच विश्वास राहिलेला नाही. आमदारांची कामे होत नाही, निधी मिळत नाही, अशी नाराजी अेकांनी जाहीरपणे व्यक्त केली आहे. त्यानंतरच हे बंड झाले, त्यामुळे याच्याशी भाजपचा काडीचाही संबंध नाही. पण सध्याचे एकूणच चित्र पाहिले तर असे दिसते की भाजप सत्ता स्थापन करेल. त्यानंतरच नाराज आमदारांची नाराजी दूर होईल आणि राज्यातील जनतेला न्याय मिळेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com