Chandrashekhar Bawankule News : भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष अन् आपण त्याचे भाग्यवान कार्यकर्ते...

Bjp : ३७० कलम, राममंदिर यासह विविध प्रश्न सहजतेने निकाली काढले. देशाला आत्मनिर्भर बनविले.
Chandrashekhar Bawankule News
Chandrashekhar Bawankule NewsSarkarnama

Latur News : भारत मातेच्या रक्षणासाठी नरेंद्रजी मोदी (Narendra Modi) यांना पुन्हा पंतप्रधान करण्याकरीता देशवासीय सज्ज असून प्रत्येकाच्या मनामनात मोदीच आहेत. येणार्‍या काळात होऊ घातलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणूकीबरोबरच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, मनपा या सर्व निवडणूकीत भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला पाहिजे, यासाठी भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आजपासून कामाला लागण्याचा संकल्प करावा, असे आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लातूर येथील मेळाव्यात बोलतांना केले.

Chandrashekhar Bawankule News
Ambadas Danve On Court Decision : सोळा आमदारांच्या अपात्रतेवर अध्यक्ष नियमाने, कायद्याने निर्णय घेतील अशी अपेक्षा..

लातूर (Latur) जिल्हा भारतीय जनता पार्टीचा संघटनात्मक जिल्हा मेळावा पार पडला. यावेळी मार्गदर्शन करतांना बावनकुळे (Chandrashekahr Bawankule) म्हणाले, आज जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी असून या पक्षाचे नेते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना जगातील १५० देशांनी सर्वोत्तम नेता म्हणून मान्य केले आहे. या पक्षाचे आपण भाग्यवान कार्यकर्ते आहोत. पक्ष आहे म्हणून सन्मान, प्रतिष्ठा आहे ही टिकवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी सतत कार्यरत असले पाहिजे.

राज्यातील ४८ लोकसभेच्या आणि २०० प्लस विधानसभेच्या जागा जिंकण्याचा संकल्प भाजपाने केला असून ईना-मिना-डिका (मशाल-हात-घड्याळ) कितीही एकत्र आले तरी काहीही फरक पडणार नाही. (Bjp) देशाला नरेंद्रजी मोदी यांच्या रुपाने सर्वोत्तम नेता मिळाला आहे. या नेतृत्वाने जगात देशाची शान आणि मान उंचावली. संसदेत प्रवेश करण्यापूर्वी नतमस्तक झाले आणि राज्य घटनेला ग्रंथ माणून कार्य सुरु केले.

वर्षानूवर्ष प्रलंबित असणारे ३७० कलम, राममंदिर यासह विविध प्रश्न सहजतेने निकाली काढले. देशाला आत्मनिर्भर बनविले, वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सुरु केल्या, गोरगरीब-सर्वसामान्य माणसाला दिलासा देणार्‍या अनेक योजना सुरु केल्या असेही बावनकुळे म्हणाले. इकडे महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सत्तेला लाथ मारुन मर्द मराठा एकनाथ शिंदे बाहेर पडले. आज राज्यात खर्‍या अर्थाने भाजपा-सेना युतीचे सरकार सत्तेवर आले.

या सरकारने एक रुपयात शेतीचा पीकविमा, लखपती होवून आता मुलगी जन्म घेणार यासह अनेक कल्याणकारी योजना जाहीर केल्या आहेत. भाजपाच्या प्रत्येक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी `घर चलो` अभियानात सक्रियतेने सहभाग नोंदवावा. पक्षाचे सर्व कार्यक्रम उपक्रम प्रभावीपणे राबवावे, असेही आवाहन त्यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in