Ajit Pawar : भाजपला उमेदवारही मिळत नाहीत; म्हणूनच आमचे लोक फोडले जात आहेत : अजित पवारांचा आरोप

कुणाच्या तरी दबावाखाली या सरकारमधील लोक काम करत आहेत.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

परभणी : सत्तेत असूनही भारतीय जनता पक्षाला (BJP) विधान परिषदेसाठी उमेदवार मिळत नाहीत. त्यामुळे आमचेच लोक फोडून त्यांना उमेदवारी देण्याचे काम भाजपकडून केले जात आहे, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. (BJP is not even getting candidates : Ajit Pawar's allegation)

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांच्या प्रचारसाठी परभणी येथे शुक्रवारी शिक्षक-प्राध्यपकांसाठी संवाद मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. खासदार संजय जाधव, आमदार राजेश टोपे, डॉ. राहुल पाटील, सुरेश वरपुडकर, बाबाजानी दुर्राणी, उमेदवार काळे, माजी आमदार सुरेश देशमुख, ॲड. विजय गव्हाणे, सीताराम घनदाट, विजय भांबळे, डॉ. मधुसुदन केंद्रे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, माजी महापौर प्रताप देशमुख आदी उपस्थित होते.

Ajit Pawar
Solapur Politics : सुशीलकुमार शिंदेंप्रमाणे प्रणितींनाही हवाय थेट गांधी परिवाराशी ‘ॲक्सेस’

पवार म्हणाले की, विधान परिषदेची निवडणूक अंतिम टप्प्यात असून पाच जागांसाठी मतदान होणार आहे. औरंगाबाद विभागाचा शिक्षक मतदारसंघ सर्वात मोठा आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार असताना विविध योजना राबविल्या होत्या. सध्याच्या सरकारने अद्यापही मंत्रिमंडळ विस्तारही केलेला नाही. जूनमध्ये हे सरकार आले, तेव्हा दोघेच होते. नंतर विस्तार केला, पण तोही अपुराच आहे. एकाही महिलेला मंत्रिमंडळात स्थान नाही, ही शोकांतिका आहे.

Ajit Pawar
Sambhaji Raje News : संभाजीराजेंनी घेतली कट्टर भाजपविरोधक मुख्यमंत्र्यांची भेट : महाराष्ट्रात रंगली ‘या’ गोष्टीची चर्चा!

सरकारमधील लोक दबावाखाली

अनेक मोठे गुंतवणूकदार महाराष्ट्राबाहेर जात आहेत. उद्योगधंदे अन्य राज्यात जात आहेत. सध्याचे सरकार एकही उद्योक आपल्याकडे आणू शकले नाही. कुणाच्या तरी दबावाखाली या सरकारमधील लोक काम करत आहेत. महाराष्ट्राच्या विकासासाठी ते काम करीत नाहीत. महागाईचा भस्मासूराला जबाबदार कोण, असा प्रश्नही पवार यांनी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com