Bjp : जनतेचा पाणी प्रश्न मांडणे हा गुन्हा असेल, तर तो आम्ही वारंवार करू...

नागरिकांना आठ-दहा दिवसानंतर पाणी येते, वर्षाच्या ३६५ दिवसांची पाणीपट्टी महापालिका वसुल करते, पाणी मात्र निम्मेही देत नाही. (Bjp Aurangabad)
Fir Filed Against Bjp Workers in Aurangabad
Fir Filed Against Bjp Workers in AurangabadSarkarnama

औरंगाबाद : शहरातील सिडको-हडको भागातील पाणी प्रश्ना संदर्भात आंदोलन करणाऱ्या भाजप (Bjp) आमदार अतुल सावे व इतर पदाधिकारी कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या अतुल सावे यांनी जनतेचा पाणी प्रश्न मांडणे जर गुन्हा असेल तर असा गुन्हा आम्ही वारंवार करू, असा इशारा दिला आहे. (Aurangabad) दोन दिवसांपुर्वी आमदार अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली सिडको-हडको भागातील जलकुंभावर पाणी प्रश्नासाठी भाजपने तीव्र आंदोलन केले होते. (Municipal Corporation)

नागरिकांना आठ-दहा दिवसानंतर पाणी येते, वर्षाच्या ३६५ दिवसांची पाणीपट्टी महापालिका वसुल करते, पाणी मात्र निम्मेही देत नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला होता. आंदोलकांनचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी स्वतः यावे, अशी भूमिका सावे आणि भाजपच्या आंदोलनकर्त्यांनी घेतली होती. परंतु महापालिका प्रशासक आंदोलनस्थळी आले नाही.

सावे यांनी त्यांना वारंवार फोन केले पण ते देखील पांडेय यांनी घेतले नाही. त्यामुळे आंदोलक संतापले आणि त्यांनी थेट प्रशासकांच्या बंगल्यावर धाव घेत आंदोलन केले. यावेळी आस्तिककुमार पांडेय यांनी आंदोनलानाला समोर जात त्यांचे निवेदन स्वीकारले. मात्र आंदोलनाच्या दोन दिवसानंतर आमदार सावे यांच्यासह अन्य आंदोलकांविरुद्ध विनापरवानगी प्रशासकांच्या बंगल्यावर आंदोलन केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Fir Filed Against Bjp Workers in Aurangabad
Imtiaz Jalil : वाईन विक्रीवर आमचे मत सोपे ; तुम्ही विक्री करा, आम्ही दुकान तोडतो..

या संदर्भात अतुल सावे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. जनतेच्या प्रश्नावर आंदोलन करायचे नाही तर मग काय करायचे? सध्या प्रचंड उन्हाळा आहे, शहरवासियांना दहा-बारा दिवस पाणी मिळत नाही. याचा जाब विचारण्यासाठी आम्ही आंदोलन केले, हा गुन्हा ठरतो का? वर्षाची पाणीपट्टी वसुल करायची आणि सहा महिनेच पाणीपुरवठा करायचा हा अन्याय आहे. जनतेच्या पाणी प्रश्नावर आंदोलन करणे गुन्हा असेल तर आम्ही ते वारंवार करू. मग आमच्यावर पोलिसांनी कितीही गुन्हे दाखल केले तर त्यांची पर्वा नाही, असेही सावे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com