अभिमानाने करायची गोष्ट तोंड काळे होत असतांना केली; रहाटकरांची खोचक टीका

खरे श्रेय हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या दबावाला व एकनाथ शिंदे यांच्या दणक्यालाही द्यावे लागेल, असा टोला देखील रहाटकर यांनी लगावला आहे. (Bjp Leader Vijaya Rahatkar)
Cm Uddhav Thackeray-Vijaya Rahatkar
Cm Uddhav Thackeray-Vijaya RahatkarSarkarnama

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीत औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव असे नामांतर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. (Shivsena) या निर्णयाचा जल्लोष शिवसेनेकडून सुरू असतांना भाजपने मात्र मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. (Bjp)भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावले असून ` जी गोष्ट अभिमानाने, सन्मानाने करायला हवी होती, ती तोंड काळे होत असतांना केली`, अशा शब्दात शिवसेनेला डिवचले आहे.

भाजपने वेळोवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी औरंगाबादचे संभाजीनगर कधी करणार? असा सवाल करत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते जे गेल्या सरकारचे मुख्यमंत्री देखील होते, त्या देवेंद्र फडणवीस यांनी देखील वेळोवेळी शिवसेनेला या प्रश्नावरून सुनावले होते.

आता जेव्हा खुर्ची धोक्यात असूनही ठाकरे यांनी आपाल हिंदुत्ववादी बाणा दाखवत या दोन्ही शहरांच्या नामांतराला मंजुरी दिली, तर त्यावरही भाजपने शिवसेनेवर निशाणा साधण्याची संधी सोडलेली नाही. विजय राहटकर यांनी नामांतराच्या विषयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

यात त्या म्हणतात, नमस्ते 'संभाजीनगर'! हा निर्णय पहिल्याच मंत्रिमंडळात उध्दव ठाकरे यांना घेता आला असता. पण शहराचे नाव बदलून पाणी मिळणार आहे का, अशी टिंगल-टवाळी करण्यातच अडीच वर्षे घालविली. आता शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत यांना पुन्हा कै. बाळासाहेबांचे हिंदुत्व आठवले आहे.

Cm Uddhav Thackeray-Vijaya Rahatkar
Aurangabad : खैरे किती एकनिष्ठ आहेत ? हे मी पत्रकार परिषद घेवून सांगेन ; बोरनारेंचा इशारा..

जी गोष्ट सन्मानाने, अभिमानाने करावयाची होती, ती तोंड असे काळे होत असताना केलेली आहे. पण, आपले जगद्गुरु श्री संत तुकोबारायांनी अशा व्यक्ती आणि प्रवृत्तींचे फार चपखल वर्णन केले आहे. `गाढवही गेले ब्रम्हचर्य गेले, तोंड काळे झाले जगामाजी! पण, खरे श्रेय हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या दबावाला व एकनाथ शिंदे यांच्या दणक्यालाही द्यावे लागेल, असा टोला देखील रहाटकर यांनी लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in