Bjp : पावणे नऊशे कोटीतून `हर घर नल से जल` योजना राबवणार; अडीचशे गांवाना मिळणार पाणी..

योजनेसाठी टेंडर प्रक्रिया सुरु असून दोनच निविदा आल्याने त्यास २२ जूनपर्यंत मुदत वाढ मिळाली आहे. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. ( Aurangabad)
Bjp : पावणे नऊशे कोटीतून `हर घर नल से जल` योजना राबवणार; अडीचशे गांवाना मिळणार पाणी..
Bjp Mla Prashant BambSarkarnama

औरंगाबाद : पाण्यासाठी अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या कामामुळे गंगापूर तालुक्यातील २१० गावे, ५२ वाड्या व वस्त्यांसह २६२ गावांना कायमस्वरुपी व शाश्वत पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Bjp) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या `हर घर नल से जल` या संकल्पनेतून जल जीवन मिशन योजने अंतर्गत ८७८ कोटींची ही पाणी पुरवठा योजना भाजपचे आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) हे आपल्या गंगापूर-खुल्ताबाद मतदारसंघात राबवणार आहेत.

या कामाची निविदाही काढण्यात आली असून २०२४ पर्यंत मतदारसंघातील प्रत्येकाच्या घरात पाणी पोहचणार असल्याचे बंब यांनी सांगितले. (Marathwada) या योजने संदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देतांना बंब म्हणाले, टंचाईग्रस्त व टँकरग्रस्त गंगापूर तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी आतापर्यंत अनेक योजना राबविण्यात आल्या. मात्र, टेंभापूरी, शिरेगाव, नांदूर- मधमेश्वर सारख्या पाण्याचा पुरेसा व शाश्वत साठा उपलब्ध नसणाऱ्या धरणांतून या योजना प्रस्तावित करण्यात आल्या होत्या.

उन्हाळ्यात या धरणांतील पाणीसाठा संपुष्टात येत असल्याने या योजना यशस्वी होऊ शकल्या नाहीत. पंतप्रधान मोदी यांनी जलजीवन मिशनची घोषणा केल्यानंतर गंगापूर तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून एकच शाश्वत ग्रीड पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेण्यासाठी आपण प्रयत्न केले. १२५३ चौरस कि.मी. क्षेत्रफळाच्या तालुक्याचे मुंबई येथील टंडन अर्बन सोल्युशन्स कंपनीकडून ३० दिवसांत ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून अंदाजपत्रके तयार करून निविदा मागविण्यात आल्या.

मराठवाड्यात पहिल्यांदाच ड्रोनने हे सर्वेक्षण केले गेले होते. खुलताबाद तालुक्यासाठीदेखील जायकवाडी धरणातून जलजीवन मिशन योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेत एकुण १२ संतुलन टाक्याद्वारे संपुर्ण तालुक्यातील २१० गांवे व २६२ वाड्या, वस्ती यांच्या उंच जलकुंभापर्यंत पंपाद्वारे पाणी पोहचविण्यात येणार आहे.

Bjp Mla Prashant Bamb
Nanded : संजय बियाणींच्या संपत्तीत माझी चार वर्षाची मुलगी वारसदार असल्याचा महिलेचा दावा..

वीज बिलात बचत व्हावी, म्हणून अमळनेर परिसरात सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प घेण्यात येणार आहे. तर २० टक्के महावितरण यांच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्याचे नियोजन आहे. योजनेसाठी टेंडर प्रक्रिया सुरु असून दोनच निविदा आल्याने त्यास २२ जूनपर्यंत मुदत वाढ मिळाली आहे. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल,अशी अपेक्षाही प्रशांत बंब यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in