लातूर जिल्हा बॅंक प्रकरणात भाजपचा थेट मुख्यमंत्री कार्यालयावरच आरोप

(Latur District Bank Election) एकाच कुटुंबातील सदस्यांशी संबंधित साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या नावावर साडेसहाशे कोटींचे कर्ज वाटप करण्यात आल्याचा दावा देखील संभाजी पाटील यांनी केला.
Bjp Mla Sambhaji Patil Nilangekar
Bjp Mla Sambhaji Patil NilangekarSarkarnama

औरंगाबाद ः लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत भाजपच्या सर्वच उमेदवारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छाननीत बाद केले होते. या विरोधात भाजपचे आमदार माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर व इतरांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बिनविरोध संचालक म्हणून निवडून आलेल्या आमदार धीरज देशमुख यांच्यासह अन्य बिनविरोध संचालकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. पंरतु या प्रकरणात संभाजी पाटील यांनी आता थेट मुख्यमंत्री कार्यालयावरच आरोप केला आहे.

जिल्हा बॅंकेतील उमेदवारी अर्जांची छाननी सुरू असतांना मुख्यमंत्री कार्यालयातून फोन करण्यात आला, संबंधित अधिकाऱ्यावर दबाव आणून भाजपसह इतर विरोधकांचे अर्ज बाद करण्यात आले, असा गंभीर आरोप संभाजीप पाटील यांनी केला आहे. मुंबई येथील भाजप कार्यालयात लातूर जिल्हा बॅंकेतील निवडणूक प्रक्रिये संदर्भात संभाजी पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली.

लोकशाहीचा खून आणि सत्ता, पैशाचा गैरवापर करत लातूर जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीत शेतकरी, सभासदांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप देखील पाटील यांनी केला. संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीला समोर जाण्यास महाविकास आघाडी सरकार घाबरत आहे. बीड, जळगाव आणि लातूर जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतून हे सिद्ध झाले आहे.

लातूर जिल्हा बॅंकेतील पाच लाख शेतकरी सभासदांना मतदानाचा हक्क नाकारून सत्ताधारी काॅंग्रेसने फक्त आठशेजणांची मतदार यादी केली. परंतु भाजपने पॅनल उभे करताच काॅंग्रेसच्या नेत्यांनी निवडणूकच होऊ नये असे प्रयत्न सुरू केले. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून भाजपसह सर्वच विरोधी उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद केले. आमदार धीरज देशमुख, राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील यांच्यासह पाच जणांनी आपण बिनविरोध निवडून आल्याचा दावा केला.

विशेष म्हणजे सर्व उमेदवारांचे अर्ज बाद करतांना त्यांच्याकडे थकबाकी असल्याचे सांगण्यात आले. सर्व उमेदवारांना आधी बेबाकी प्रमापत्र दिलले असतांना नंतर दोन दिवसांत या सगळ्यांकडे थकबाकी असल्याचे पत्र एकाच दिवशी तयार करण्यात आले होते.

उमेदवारी अर्ज छाननीच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सीएमओ आॅफीमधून फोन आला. विरोधकांचे अर्ज बाद करण्यासाठी दबाव टाकण्यात आला त्यानंतरच आमचे अर्ज बाद केले गेले, असा आरोप संभाजी पाटील यांनी केला.

Bjp Mla Sambhaji Patil Nilangekar
अनेक संकटं आली, वादळं आली ; पण मी कधी डगमगलो नाही, थांबलो नाही

लातूर जिल्हा बॅंकेही राज्यातील सर्वात यशस्वी बॅंक असल्याचा दावा काॅंग्रेसकडून केला जातो. पण सर्वाधिक भ्रष्टाचार असलेली लातूर जिल्हा बॅंक ही राज्यातील एकमेव बॅंक आहे. एकाच कुटुंबातील सदस्यांशी संबंधित साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या नावावर साडेसहाशे कोटींचे कर्ज वाटप करण्यात आल्याचा दावा देखील संभाजी पाटील यांनी केला.

लातूर जिल्हा बॅंकेच लोकशाहीचा खून करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करा, या मागणीसाठी आम्ही शेतकऱ्यांसह राज्यपाल भगतसिंह कोशयारी यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com