विधान परिषदेला डावलल्यानंतर पंकजा मुंडेंसाठी दिल्लीतून भाजपश्रेष्ठींचा खास निरोप

भाजपकडून बुधवारी विधान परिषदेसाठी पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
BJP Leader Pankaja Munde Latest Marathi News
BJP Leader Pankaja Munde Latest Marathi News Sarkarnama

मुंबई : भाजपने बुधवारी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. पण त्यामध्ये पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या नावाचा समावेश नाही. राज्यसभेनंतर विधान परिषदेतही त्यांना डावलण्यात आलं आहे. पण तिकीट नाकारलं असलं तरी दिल्लीतून पक्षश्रेष्ठींनी पंकजा यांच्यासाठी खास निरोप पाठवल्याचे समजते. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. (Pankaja Munde Latest Marathi News)

भाजपने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, प्रसाद लाड व माजी मंत्री राम शिंदे यांना संधी दिली आहे. तर श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांनाही विधान परिषदेची लॉटरी लागली आहे. तर पंकजा मुंडे यांना पुन्हा डावलण्यात आले आहे. राज्यसभेच्या उमेदवारांची घोषमा करतेवेळीही त्यांच्या नावाची चर्चा होती. पण तिथेही त्यांच्या पदरी निराशाच पडली होती. (BJP Latest Marathi News)

BJP Leader Pankaja Munde Latest Marathi News
पंकजा मुंडेंना डावलून उमा खापरेंना संधी: दरेकर, लाड, भारतीय, शिंदेंनाही विधान परिषेदची उमेदवारी

पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत संधी मिळाली तर त्याचं सोनं करेन, असं म्हटलं होतं. त्यामुळे त्या इच्छुक असल्याची जोरदार चर्चा होती. पण त्यांना पुन्हा डावलण्यात आलं. त्यांच्याजागी उमा खापरे यांना संधी देण्यात आली. त्यानंतर आता मुंडे यांच्यासाठी दिल्लीतून निरोप आल्याचे समजते. पंकजा मुंडेंनी परळी विधानसभा जिंकावी, असा निरोप पाठवण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.

दरम्यान, विधान परिषदेसाठी ९ जून अर्ज भरण्याची अखेरची तारीख असल्याने आज यादी जाहीर करण्यात आली आहे. १० जूनच्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ९ ऐवजी ८ जून रोजीच नावे निश्चित होवून अर्ज भरले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, सभापती रामराजे निंबाळकर यांच्यासह सुभाष देसाई, दिवाकर रावते, (शिवसेना) प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत, प्रसाद लाड, विनायक मेटे, सुजितसिंह ठाकूर, आर. एस. सिंह, (सर्व भाजप) संजय दौंड (राष्ट्रवादी) हे दहा सदस्य निवृत्त होणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे दोन सदस्य कमी निवडून येतील.

विधान परिषदेसाठी 20 जूनला निवडणूक होणार आहे. विधान परिषदेवर निवडून यायचे असेल तर 27 मतांची आवश्यकता असणार आहे. भाजप आणि मित्रपक्ष मिळून संख्याबळ 113 होत आहेत. त्यामुळे भाजपच्या चार जागा निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) 53, शिवसेना (Shivsena) 56 आणि कॉंग्रेसचे (Congress) 44 आमदार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com