भाजपचे उमेदवार सुभाष साबणे कोट्याधीश, पत्नीकडेही लाखोंची संपत्ती
Bjp Candidate Subhash SabneSarkarnama

भाजपचे उमेदवार सुभाष साबणे कोट्याधीश, पत्नीकडेही लाखोंची संपत्ती

(Deglur-Biloli by Election)रोख रक्कम, शेती, प्लाॅट, निवासी इमारत, घर, बॅंक व अन्य गुंतवणूक असलेले साबणे हे देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातील तगडे उमेदवार म्हणून ओळखले जातात.

औरंगाबाद ः दोनवेळा मुखेड व एकदा देगलूर-बिलोली मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेले व सध्या भाजपचे उमेदवार असलेले सुभाष साबणे हे कोट्याधीश आहेत. रोख रक्कम, शेती, प्लाॅट, निवासी इमारत, घर, बॅंक व अन्य गुंतवणूक असलेले साबणे हे देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातील तगडे उमेदवार म्हणून ओळखले जातात.

साबणे यांच्या प्रमाणेच त्यांच्या पत्नी गंगाबाई या देखील लक्षाधीश आहेत. त्यांच्या नावावर देखील प्लाॅट, पाॅलीसी व इतर स्थावर, जंगम मालमत्ता आहेत. या शिवाय त्या दहा तोळे सोनं देखील बाळगून आहेत. काॅंग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे देगलूर-बिलोली मतदारसंघाची पोटनिवडूणक जाहीर झाली आहे.

महाविकास आघाडीचे जितेश अंतापूरकर विरुद्ध भाजपचे सुभाष साबणे यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे. जितेश यांना वडिलांच्या निधनाची सहानुभूती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर भाजप पंढरपूर पॅटर्नची पुनरावृत्ती साबणेच्या रुपाने करण्याचा दावा करत आहे. आर्थिक स्थितीचा विचार केला तर साबणे हे तगडे उमेदवार दिसतात.

निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या शपथ पत्रात आपल्या व पत्नीच्या नावे असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या संपत्तीचा तपशील दिला आहे. त्यानूसार सुभाष साबणे यांच्याकडे ९ लाख ३९ हजार १९४ एवढी रोख रक्कम असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

६ लाख १० हजारांच्या बॅंकेत एफडी, २ लाखांची म्युचलफंडात गुंतवणूक, २४ लाखांची पाॅलीसी, या शिवाय त्यांनी ३२ लाख ८६ हजार रुपये हे उसणवारीने दिलेले आहेत. तसेच एक तोळ्याची सोन्याची अंगठी अशी एकूण ७४ लाख ६७ हजार ४४३ एवढी जंगम मालमत्ता ते बाळगून आहेत.

तर त्यांच्या पत्नी गंगाबाई यांच्याकडे ६ लाख ३३ हजार ९३ रुपये रोख, साडेनऊ हजारांची एफडी, २ लाख ६४ हजारांची एलआयसी पाॅलीसी, उसणवारीने दिलेले १० लाख व २ लाख ८० हजारांचे दहा तोळे सोने अशी संपत्ती दाखवण्यात आली आहे.

या शिवाय साबणे व त्यांच्या पत्नीच्या नावावर कमळेवाडी व देगलूर तालुक्यात ४ एकर २९ गुंठे एवढी साधरणतः ३८ लाख मुल्य असलेली शेतजमीन, बिगरशेती जमीन म्हणजेच प्लाॅट, निवासी इमारत, मुखेड, देगलूर आणि कमळेवाडी येथे असल्याचे शपथ पत्रात नमूद केले आहे.

Bjp Candidate Subhash Sabne
राज्याच्या मंत्र्यांनाच पडला कोरोनाचा विसर

त्यानूसार सुभाष साबणे यांच्या नावावर एकूण २ कोटी २० लाख १८ हजार ५३२ रुपयांची, तर त्यांच्या पत्नी गंगाबाई यांच्या नावे १५ लाख ९३ हजार ४२० एवढी स्थावर व जंगम मालमत्ता असल्याने स्पष्ट करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे सुभाष साबणे यांना बॅक, वित्तीय संस्था व वैयक्तिक अशी एकूण ७० लाख २४ हजार ९८४ एवढी देणी असल्याचे सांगण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.