Imtiyaz Jaleel News : मोठी बातमी! खासदार इम्तियाज जलील अडचणीत; छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हा दाखल

Chhatrapati Sambhajinagar : औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर कारवाई होणार!
Imtiyaz Jaleel
Imtiyaz JaleelSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar News : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नामांतर केल्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आक्रमक झाले आहेत. नामांतराच्या विरोधात त्यांच्याकडून आंदोलन केलं जात आहे. दरम्यान, आता सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे जलील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष समितीतर्फे खासदार इम्तियाज जलील( Imtiyaz Jaleel) यांचं नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु आहे. याचदरम्यान, खासदार जलील यांनी गुरुवारी (दि.९) औरंगाबाद शहराच्या छत्रपती संभाजीनगर नामांतर करण्याच्या निर्णयाविरोधात पोलिसांनी परवानगी नाकारलेली असतानाही शहरात कँडल मार्च काढला होता. आता याप्रकरणी जलील यांच्यासह १५०० अज्ञातांवर जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील सिटी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Imtiyaz Jaleel
Eknath Khadse News : राष्ट्रवादीचं ठरलं; एकनाथ खडसेंची विधान परिषदेच्या गटनेतेपदी वर्णी

काय आहे प्रकरण ?

औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष समितीचे संयोजक मोहम्मद अय्युब जहागीरदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा भडकल गेटपर्यंत कँडल मार्च करीता पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र या कँडल मार्चची परवानगी सिटीचौक पोलिसांनी नाकारली होती. तसेच असा मार्च काढू नयेत अशी नोटीस देखील पोलिसांकडून देण्यात आली होती. मात्र तरीही जलील यांच्यासह हजारो लोकांनी रस्त्यावर उतरुन कँडल मार्च काढला होता.

खासदार इम्तियाज जलील यांच्यासह औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष समितीचे संयोजक अय्युब जहागीरदार, महमुझ उर्रहमान फारुकी, आरेफ हुसैनी, फेरोज खान, नासेर सिद्दीकी, मोहम्मद समीर बिल्डर, शकुर सालार, शारेक नक्षबंदी, कुनाल खरात, प्रांतोष वाघमारे, गंगाधर ढगे, गाजी सादोद्दीन उर्फ पप्पु कलानी, सलीम सहारा व औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष समिती पदाधिकारी तसेच इतर 1000 ते 1500 बेकायदेशीर जमाव यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Imtiyaz Jaleel
Assembly Session: रासायनिक खते खरेदी करताना जात सांगावी लागणार; विरोधक आक्रमक; मुनगंटीवारांनी लढवला किल्ला

औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्यांवर कारवाई होणार!

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेच्या सभागृहात औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती. तसेच त्यांनी एमआयएम तसेच आंदोलनकर्त्यांकडून कोणतीही वेळ न पाळता रात्री १२ वाजेपर्यंत घोषणाबाजी करून वेळेच्या नियमांचं उल्लंघन केलं जातंय याकडे सभागृहाचे लक्ष वेधलं. यावर गृहमंत्री यांच्याशी चर्चा करून त्यावर कारवाई केली जाईल असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com