Sandipan Bhumre News : कारखान्याची सुत्रे हाती ठेवण्यासाठी भुमरेंचे प्रयत्न ; १२ संचालक बिनविरोध झाल्याचा दावा..

Sugar Factory : १४ जूनला अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होईल आणि २५ जुन रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे.
Sandipan Bhumre Sugar Factory News
Sandipan Bhumre Sugar Factory News Sarkarnama

Paithan : राज्याचे रोजगार हमी योजना तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी मतदारसंघातील विहामांडवा येथील रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखाना आपल्याच ताब्यात राहावा यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. (Sandipan Bhumre Sugar Factory News) या कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून २१ पैकी १२ संचालक बिनविरोध झाल्याचा दावा पालकमंत्र्यांचे चिरंजीव विलास भुमरे यांनी केला आहे.

Sandipan Bhumre Sugar Factory News
Sandipan Bhumre On Danve's Allegation: दानवेंच्या आरोपावर भुमरे म्हणाले, टॅब खरेदी आधीच आरोप हास्यास्पद..

एवढेच नाही तर १२ संचालक बिनविरोध निवडून आल्यामुळे कारखाना आपल्या ताब्यात आल्याचा दावा करत त्यांच्या समर्थकांनी फटाकेही फोडले. (Paithan) रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्याची २१ संचालकांसाठी निवडणूक सुरू आहे.

(Shivsena) संदिपान भुमरे यांच्या नेतृत्वाखाली पॅनलचे बारा संचालक बिनविरोध निवडून आल्याचा दावा जिल्हा परिषदेचे माजी सभापती विलास बापू भुमरे यांनी केला आहे. (Marthwada) हा दावा खरा मानला तर भुमरे यांची दुसऱ्यांदा कारखान्यावर सत्ता आली असे म्हणावे लागेल.

बंद असलेला हा साखर कारखाना भुमरे यांनी सुरू केला आहे. कारखान्याची निवडणूक सुरू असून २१ संचालकांसाठी १३ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. १४ जूनला अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होईल आणि २५ जुन रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे.

दरम्यान, कारखान्याचे संस्थापक चेअरमन यांचे चिरंजीव अनिल घोडके यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला आहे. कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भुमरे पिता-पुत्रांनी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. २१ पैकी १२ संचालक बिनिवरोध झाल्याचा त्यांचा दावा आहे. उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com