Bhumre : हो, देसाई पालकमंत्री असतांना दहा टक्के कमिशन घ्यायचे ; मी पुरावे देवू शकतो..

सुभाष देसाई चोवीस तास मातोश्रीमध्ये असायचे. मुंबईत एवढे मोठे उद्योग होते, ते सोडून छोट्या छोट्या कार्यकर्त्याकडून पैशाची अपेक्षा ठेवल्यामुळे कार्यकर्त्यात मोठी नाराजी होती. (Guardian Minister)
Sandipan Bhumre-Subhash Desai News, Aurangabad
Sandipan Bhumre-Subhash Desai News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन पालकमंत्री असलेले सुभाष देसाई यांनी डीपीडीसीतील विकास कामात दहा-दहा टक्क्यांनी पैसे घेऊन कार्यकर्त्यांच्या कामात अडवणूक केली. पैसे घेतल्याशिवाय रस्त्याला निधी मिळत नव्हता? केटिवेअरला निधी मिळत नव्हता. पैसे दिल्यानंतरच रस्त्याच्या व विविध विकास कामाला निधी मिळायचा असा आरोप पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी पुन्हा एकदा केला आहे.

Sandipan Bhumre-Subhash Desai News, Aurangabad
Shivsena : शिंदे गटावर तुटून पडणारे आदित्य ठाकरे फडणवीसांच्या बाबतीत मवाळ ?

भुमरे फुलंब्री येथील एका कार्यक्रमात बोलत होते. एकीकडे शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे सत्तार, शिरसाट, भुमरे यांच्या मतदारसंघात जाऊन शिंदे सरकारवर हल्ला चढवत आहेत. (Shivsena) तर दुसरीकडे पालकमंत्री संदीपान भुमरे हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात पालकमंत्री असलेले सुभाष देसाई (Subhash Desai) यांचा टक्केवारीचा कारभार कसा होता, हे जाहीरपणे सांगत आहेत.

भुमरे म्हणाले, सुभाष देसाई १० टक्के कमिशन घेतल्याशिवाय विकास कामाला निधीच देत नव्हते. त्यांनी सांगावं की हे आरोप खोटे आहेत. मी पुराव्यासह सिद्ध करून दाखवतो, असे खुले आव्हान देखील भुमरेंनी दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आम्ही जाऊन पक्षात उठाव केला आहे. आम्ही गद्दार नसून सच्चे शिवसैनिक आहोत. आम्हाला गद्दार म्हणणाऱ्यांनीच शिवसेना संपविण्याचे काम केले आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तात्कालीन उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी डीपीडीसीअंतर्गत करण्यात येणाऱ्या विविध कामात दहा-दहा टक्क्यांनी पैसे घेतले. पालकमंत्रीच पैसे घेत असेल तर मग कार्यकर्त्यांनी काम करायची कशी ? कार्यकर्ते नुसते झेंडे आणि बॅनरच लावणारे पाहिजे का? कार्यकर्त्यांकडे जर पैशाची मागणी होत असेल तर कार्यकर्त्यांनी पक्ष वाढवायचा की यांना पैसे द्यायचे, असा टोला देखील भुमरे यांनी लगावला.

सुभाष देसाई चोवीस तास मातोश्रीमध्ये असायचे. मुंबईत एवढे मोठे उद्योग होते, ते सोडून छोट्या छोट्या कार्यकर्त्याकडून पैशाची अपेक्षा ठेवल्यामुळे कार्यकर्त्यात मोठी नाराजी होती. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे आम्ही सर्वांनीच उठाव करून नेतृत्व बदललं पक्ष नाही, असेही भुमरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com