Cm Eknath Shinde-Minister Bhumre News Aurangabad
Cm Eknath Shinde-Minister Bhumre News AurangabadSarkarnama

Aurangabad : भुमरे कानात येऊन सांगत होते, पण मुख्यमंत्र्यांनी कोणतीच घोषणा केली नाही..

मुख्यमंत्री शिंदे पैठणसाठी आणखी एखादी मोठी घोषणा करतील या अपेक्षेने भुमरे संपुर्ण भाषण संपेपर्यंत त्यांच्या मागे घुटमळत होते. (Cm Eknath Shinde)

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सत्काराच्या निमित्ताने रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांचा शक्तीप्रदर्शन करण्याचा उद्देश सफल झाला. पण पैठणमध्ये येऊन मुख्यमंत्री मोठी घोषणा करतील, संत ज्ञानेश्वर उद्यान, पैठणी क्लस्टर, रस्त्यासाठी निधीची घोषणा करतील ही अपेक्षा मात्र फोल ठरली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) भाषण करत असतांना भुमरे त्यांच्या पाठीमागेच उभे होते. (Paithan) भाषण सुरू असतांना ते शिंदेच्या कानात येऊन काही तरी सांगत होते, पण मुख्यमंत्र्यांनी मात्र ते ऐकून घेतले, कुठलीही मोठी घोषणा मात्र केली नाही. त्यामुळे भुमरेंच्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी फिरल्याची चर्चा सुरू झाली.

शिंदे गटाचे बंड आणि त्याला भुमरे यांनी पाठिंबा दिल्यानंतर मतदारसंघात मोठी सभा घेऊन शक्तीप्रदर्शन करण्याची वाट ते अनेक दिवसांपासून पाहत होते. (Aurangabad) आज ती संधी मिळाली खरी, पण त्या संधीच सोन करण्यात मात्र भुमरेंना यश मिळाले नाही. मुख्यमंत्र्यांच्या सभेला पैसे देवून माणसं आणल्याचा विरोधकांचा आरोप होत असतांना कुठलीही मोठी घोषणा न होणं हे भुमरेंचे अपयश असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या स्वागतात भुमरे पिता-पुत्रांनी कोणतीच कसर शिल्लक ठेवली नाही. अगदी आदित्य ठाकरे यांचे जंगी स्वागत झाले त्याच बिडकीनमध्ये शिंदेची पेढेतुला व स्वतःची लाडू तुला करण्याची तयारी करत भुमरेंनी शिवसेनेला डिवचले. दीड महिन्यात पैठणला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन हजार कोटींचा निधी दिल्याचे छातीठोकपणे भुमरेंनी सभेत सांगितले. या शिवाय मतदारसंघात अजून काय कामे करायची आहेत, त्यासाठी किती निधी लागणार आहे याची जंत्री देखील मांडली.

Cm Eknath Shinde-Minister Bhumre News Aurangabad
Shivsena : धमक्या द्यायला मुंबई, महाराष्ट्र राणेंना आंदण दिलायं का?

मुख्यमंत्री शिंदे पैठणसाठी आणखी एखादी मोठी घोषणा करतील या अपेक्षेने भुमरे संपुर्ण भाषण संपेपर्यंत त्यांच्या मागे घुटमळत होते. मध्येच कानात जाऊन काही तरी सांगत होते. मुख्यमंत्र्यांनी मात्र शिंदे-फडणवीस सरकारने घेतले निर्णय आणि पैठणसाठी दिलेला निधी याचा उल्लेख भाषणात करत आपली पाठ थोपटवून घेतली. भुमरेंनी केलेल्या मागण्यांवर मात्र घोषणा न करता सरकार याचा विचार निश्चित करेल, असे सांगत भुमरेंची बोळवण केल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे आता मतदारसंघातील विकासकामांसाठी शिंदेची कृपादृष्टी भुमरेंवर कधी होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com