Sandipan Bhumre On Loksabha Seat : भुमरेंनी परस्परच ठरवले, लोकसभेची जागा लढवणार ; भाजपला दुसरी देणार..

Shivsena : भुमरेंनी मांडलेली भूमिकाच मुख्यमंत्र्यांची देखील नाही ना? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहे.
Sandipan Bhumre On Loksabha News
Sandipan Bhumre On Loksabha NewsSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : लोकसभा निवडणूक (Loksabha Seat ) वर्षभरावर येवून ठेपल्या आहेत. आतापर्यंत शिवसेना आणि भाजप हे दोघे युती करून महाराष्ट्रात निवडणुक लढवत आले आहेत. यावेळची परिस्थिती मात्र बदलली आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना फूटुन त्याचे दोन गट झाले आहेत. शिंदे यांची शिवसेना मुळ असल्याचा दावा केला जातोय. तर ठाकरे म्हणतात आमचीच खरी शिवसेसना. शिंदे-फडणवीसांचे सरकार राज्यात असल्यामुळे आता ठाकरे गटाकडे असलेल्या लोकसभा मतदारसंघावरही भाजपने दावा सांगायला सुरूवात केली आहे.

Sandipan Bhumre On Loksabha News
Dhnanjay-Pankaja Munde News : `जवाहर`, साठी मतदान सुरू, मुंडे बहिण-भाऊ पुन्हा आमने-सामने...

यावर शिंदे गटाच्या विद्यमान खासदार व इच्छूकांना देखील `हाताची घडी तोंडावर बोट`, ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिलेल्या आहेत. तरी देखील अधूनमधून लोकसभेच्या जागांवर दावे-प्रतिदावे केले जातात. (Shivsena) छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या जागे संदर्भात असाच दावा पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी केला आहे. ते स्वतः इच्छूक असल्यामुळे कदाचित ते असा दावा करत असावेत अशी देखील चर्चा आहे.

यावेळी तर त्यांनी ठामपणे छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा आम्हीच लढवणार असे परस्पर जाहीर करून टाकले. एवढ्यावरच ते थांबले नाही, तर भाजपला या बदल्यात दुसरी एखादी जागा देवू, असेही ते म्हणाले. (Bjp) एरवी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे वरिष्ठ नेते या संदर्भात अंतिम निर्णय घेतील असे सांगणाऱ्या भुमरेंनी यावेळी मात्र थेट दावा आणि भाजपला त्याबदल्यात दुसरी जागा देण्याचे जाहीरपणे सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात रोजगार हमी योजना खात्याचे मंत्री असलेले आणि त्यांचे विश्वासू अशी ओळख असलेल्या भूमरेंनी एवढ्या ठामपणे हे सांगितल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भुमरेंनी मांडलेली भूमिकाच मुख्यमंत्र्यांची देखील नाही ना? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहे.

भुमरेंच्या या दाव्यामुळे भाजपकडून लोकसभा लढवण्यास इच्छूक असलेल्या व सध्या केद्रांत अर्थ राज्यमंत्री असलेल्या डाॅ. कराडांची मात्र यामुळे धाकधुक वाढली आहे. या संदर्भात त्यांना विचारले तेव्हा त्यांनी अधिक न बोलता भाजपचे वरिष्ठ नेते ठरवतील असे सांगत वेळ मारून नेली आहे. तर दुसरीकडे ज्या भुमरेंचा पैठण मतदारसंघच छत्रपती संभाजीनगरात येत नाही, ते भुमरे दावेदारी कशी करू शकता, अशी चर्चा शिंदे गटातूनच होतांना दिसते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com