Bhumre : खैरेंनी २५ वर्ष फक्त पुजा-अर्चाच केली, विकासकामे केलीच नाहीत..

मी पुजेच्या विरोधात नाही, आम्ही देखील पूजा करतो, पण त्यासोबतच जनतेची कामे देखील करावी लागतात. खैरे मात्र उठसूठ देवदर्शन आणि पुजेला जात होते. (Minister Sandipan Bhumre)
Minister Sanipan Bhumre-Chandrakant Khiare News
Minister Sanipan Bhumre-Chandrakant Khiare NewsSarkarnama

औरंगाबाद : सरकार पाडण्यासाठी चंद्रकांत खैरेंनी यज्ञ केला, पण असे यज्ञ आणि पुजा करून सरकार पडतं नसते. (Shivsena) नाहीतर देशभरात लोकांनी महायज्ञ केले असते आणि सरकारे पाडली असती. चंद्रकांत खैरेंनी २५ वर्षात फक्त पूजा-अर्चाच केली. विकासकामे केलीच नाहीत, अशा शब्दात रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khiare) यांच्यावर टीका केली.

२५ वर्षात केलेले एखादे विकासकाम त्यांनी दाखवून द्यावे, असे आव्हान देखील भुमरेंनी यावेळी दिले. (Marathwada) श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी खैरेंकडून होणाऱ्या टीकेला उत्तर दिले.

भुमरे म्हणाले, रोहयोमंत्री म्हणून गेल्यावेळी मी अनेक महत्वाचे निर्णय घेतले, त्यापैकी मातोश्री पाणंदन रस्ते हा एक होय. शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची ही योजना होती. हजारो किलोमीटरचे पाणंदण रस्ते आपण या माध्यमातून निर्माण केले. ज्यामुळे शेतकऱ्यांना आपला भाजीपाला-फळं वेळेत बाजारात पोहचवणे शक्य होत आहे.

रोजगार हमी योजनेच्या खात्यात गेल्या अडीच वर्षात आम्ही सर्वाधिक निधी खर्च केला. अडीच ते तीन हजार कोटी खर्च करण्याची ही पहिलीच वेळ होती. यावर्षी आम्ही ९ ते १० हजार कोटी खर्च करणार आहोत. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आमच्यावर टीका करतात, मात्र २५ वर्षात त्यांनी काय केले, एखादे केलेले काम ते सांगू शकतात का? असा सवाल करत त्यांनी फक्त पूजा केली, दुसरं काहीच केलं नाही, अशी टीका देखील भुमरे यांनी केली.

Minister Sanipan Bhumre-Chandrakant Khiare News
LPG Cylinder : गुड न्यूज : कमर्शिअल गॅस सिलेंडर्सच्या किंमतींमध्ये मोठी घट, घरगुती सिलिंडरचे दर जैसे थे

मी पुजेच्या विरोधात नाही, आम्ही देखील पूजा करतो, पण त्यासोबतच जनतेची कामे देखील करावी लागतात. खैरे मात्र उठसूठ देवदर्शन आणि पुजेला जात होते, त्यामुळे त्यांना विकासकामे करता आली नाही आणि आता ते आमच्यावर टीका करत आहेत. पुजा किंवा यज्ञ करून सरकार पडतं नसते, असे असते तर देशभरात कितीजणांनी महायज्ञ केले असते? असा टोला देखील भुमरे यांनी खैरेंना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in