भुमरेंकडे फक्त झेंडावंदनाची जबाबदारी, पालकमंत्री अजून ठरायचायं ; सत्तारांचे सूचक विधान

आता पालकमंत्री पदासाठी सत्तार आग्रही असल्याचे समजते. त्यामुळेच त्यांनी भुमरे हे फक्त झेंडावंदन करणार आहेत, हे सांगत आपणही स्पर्धेत असल्याचे सांगून टाकले. (Abdul Sattar)
Minister Sandipan Bhumre-Abdul Sattar News Aurangabad
Minister Sandipan Bhumre-Abdul Sattar News AurangabadSarkarnama

औरंगाबाद : स्वातंत्र्यदिनी झेंडावंदनाची जबाबदारी शिंदे-फडणवीस सरकारमधील २० मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे. (Marathwada) मराठवाड्यात औरंगाबाद येथे संदीपान भुमरे, जालना अब्दुल सत्तार, परभणी अतुल सावे तर उस्मानाबादला तानाजी सावंत हे ध्वजारोहण करणार आहेत. परंतु ही जबादारी ही तात्पुर्ती आहे, यावरून ज्यांनी झेंडा फडकवला तेच पालकमंत्री असा कोणी काढू नये, असा सूचक इशारा मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी दिला.

संदीपान भुमरे हे फक्त झेंडावंदन करणार आहेत, पालकमंत्री अजून ठरलेला नाही, असे सांगत सत्तारांनी मीही रेसमध्ये असल्याचे अधोरेखित केले. (Guardian Minister) शिंदे-फडणवीस मंत्रीमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्री म्हणून सत्तार यांचा शेवटच्या क्षणी समावेश करण्यात आला. त्यानंतर आज ते मुंबईहून औरंगाबादेत परतले.

भुमरे आणि सत्तार एकाच विमानातून आले, त्यामुळे दोघांच्याही समर्थकांनी विमानतळावर मोठी गर्दी केली होती. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलतांना सत्तार यांनी पालकमंत्रीपदावरून सुरू असलेल्या चर्चेवर वरील स्पष्टीकरण दिले. शिंदेगट आणि भाजपच्या प्रत्येकी ९ अशा एकूण १८ मंत्र्यांचा शपथविधी झाला असला तरी अद्याप खातेवाटप झालेले नाही. यावर देखील १५ आॅगस्टच्या रात्रीपर्यंत खातेवाटप केले जाईल असे देखील सत्तार यांनी स्पष्ट केले.

औरंगाबाद जिल्ह्याला नव्या सरकारमध्ये तीन कॅबिनेट मंत्री मिळाले आहेत. कुणाला कोणते खाते मिळते हे अद्याप स्पष्ट झाले नाही, तर पालकमंत्री पदाची चर्चा सुरू झाली आहे. झेंडावंदनाची जबाबदीर सोपवलेले मंत्रीच पुढे पालकमंत्री होणार का? अशी देखील चर्चा आहे. यावर सत्तार यांनी भुमरेंचे नाव घेत त्यांना फक्त झेंडावंदनाची जबाबदीर देण्यात आली आहे, पालकमंत्री अजून ठरायचायं, असे सांगितले.

Minister Sandipan Bhumre-Abdul Sattar News Aurangabad
शिंदेची खरी शिवसेना आणि आम्ही विधानसभेला दोनशे जागा निवडून आणू..

मंत्रीमंडळातून पत्ता कट होताहोता राहिलेले अब्दुल सत्तार आता पालकमंत्री पदावर देखील दावा सांगतात की काय? असे त्यांच्या विधानवरून वाटते. टीईटी घोटाळ्यात सत्तार यांच्या मुलांची नावे आल्यानंतर मंत्रीमंडळ विस्ताराच्या यादीतून त्यांचे नाव वगळण्यात आले होते. पण रात्री उशीरापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यात झालेली खलबते, वादावादी आणि शिष्टाईनंतर अखेर मंत्रीपदाची माळ सत्तारांच्या गळ्यात पडली.

आता पालकमंत्री पदासाठी सत्तार आग्रही असल्याचे समजते. त्यामुळेच त्यांनी भुमरे हे फक्त झेंडावंदन करणार आहेत, हे सांगत आपणही स्पर्धेत असल्याचे सांगून टाकल्याची चर्चा होत आहे. भुमरे हे पैठण विधानसभा मतदारसंघातून पाचवेळा निवडून आलेले आहेत, तर सत्तार सिल्लोड-सोयगांवमधून तीनवेळा. ठाकरे सरकारमध्ये ज्येष्ठतेच्या निकषावरच भुमरेंना कॅबिनेट मिळाले होते, तर सत्तारांना राज्यमंत्री पदावर समाधान मानावे लागले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com